Breaking Ticker

जळकोट तालुक्यातील चार ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांचा ५%निधी वाटप


कमलाकर वाघमारे, प्रतिनिधी जळकोट

जळकोट तालुक्यातील मौजे बेळसांगवी ग्रामपंचायत, लाळी (खु) ग्रामपंचायत, धामणगाव ग्रामपंचायत व माळहिपरगा या ग्रामपंचायतीने दिनांक 28 एप्रिल रोजी दिव्यांगाचा ५% राखीव निधी वाटप करण्यात आला आहे. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव होणराव, तालुका सचिव नामदेव केंद्रे उपस्थित होते. 

ग्रामपंचायत कार्यालय बेळसांगवी येथे 28 एप्रिल रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात गावातील बारा दिव्यांगांना प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे सहा हजार रुपये चा धनादेश वाटप करण्यात आला यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव होनराव व सचिव नामदेव केंद्रे उपस्थित होते. यावेळी बेळसांगवी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच गावातील दिव्यांगाचाही सत्कार करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.. 

व जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय लाळी (खु) येथील दहा दिव्यांगांना 300 प्रमाणे एकूण तीन हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कार्यालय माळहिपरगा येथील 19 दिव्यांगांना प्रत्येकी 600 रुपये एकूण 11, हजार 400 रुपये वाटप करण्यात आले व ग्रामपंचायत कार्यालय धामणगाव येथील २० दिव्यांगांना प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे एकूण दहा हजार रुपयाचा धनादेश वाटप करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालय बेळसांगवी येथील ग्रामपंचायत अधिकारी साबळे व्ही व्ही, उपसरपंच / प्रशासक सौ मीनाताई वामन वाघमारे प्रशासकीय समिती तथा ग्रामपंचायत सदस्य भारत बाई रमेश एकघरे, कोंडाबाई रामचंद्र तेलंगे, ज्योती शिवाजी सोमवंशी, निवृत्ती बाबाराव श्रीमंगले, मच्छिंद्र तुळशीराम कांबळे. उपस्थित होते 

तर ग्रामपंचायत कार्यालय लाळी ( खु ) येथील ग्रामपंचायत अधिकारी साबळे व्ही व्ही, सरपंच साक्षी विजयकुमार बिराजदार, उपसरपंच गुणवंत रामदास पाटील, सदस्य माधव गुरुनाथ मिरजगावे ,दामोदर श्रीपती भालेराव, यशोदा राजेंद्र कांबळे, सुमन रघुनाथ पाटील ,मंगलबाई विजयकांत देवशेट्टे, उषाताई गंगाधर उळागडे व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.