Breaking Ticker

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नंदुरबारची 21 एप्रिल पासून बेमुदत राज्यव्यापी संपाची घोषणा!



प्रतिनिधी शहादा 

     राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना मार्फत 21 एप्रिल पासून बेमुदत राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. यासाठी नंदुरबार या ठिकाणी सराव हायस्कूलला सर्व व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती.  राज्यव्यापी कर्मचारी संपावर जाण्याबाबत या अगोदरच जिल्हा स्तरावर निवेदन देण्यात आले होते अशी माहिती मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर हेमंत देवकर यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर अधिसूचना जाहीर करणे, सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करणे, भारतीय दंड संहितेचे कलम 353 दखलपात्र करणे, प्रलंबित कर्मचारी भरती सुरू करणे  अशा विविध मागण्यांकरिता दिनांक 21 एप्रिल 2026 पासून राज्यव्यापी संपाची घोषणा केलेली आहे. सदर संपाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या समन्वय समितीची बैठक श्रॉफ हायस्कूल नंदुरबार येथे पार पडली. सदर बैठकीत मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. हेमंत देवकर, सरचिटणीस सुभाष महिरे, कार्याध्यक्ष विनायक गावीत, उपाध्यक्ष प्रीतम साळवे, टीडीएफचे कार्याध्यक्ष नरेंद्र पाटील,  कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे  जिल्हा उपाध्यक्ष असिफ शहा, जिल्हा रुग्णालय नंदुरबारचे सुभाष कोकणी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे हरेश कुमार कुकावलकर, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जयेश वाणी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तुषार सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रशांत बागुल, टीडीएफ व शिक्षक भारतीचे सय्यद इस्रार अली हे उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.हेमंत देवकर यांनी संपाची पूर्वतयारी व नियोजन  याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संघटनेचे सरचिटणीस  सुभाष महिरे यांनी संपाच्या आवश्यकते बाबतचे महत्त्व विशद करून बैठकी अंती सर्वांचे आभार मानले. सदर बैठकीचे संपूर्ण नियोजन शिक्षकेतर संघटनेचे जयेश वाणी यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.