Breaking Ticker

यवत येथे गावठी दारू भट्टीवर पोलिसांची कारवाई; 23 हजारांचा मुद्देमाल जप्त




दौंड प्रतिनिधी : गणेश दिवेकर

पुणे ग्रामीण : दौंड तालुक्यातील यवत परिसरात गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर यवत पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात कच्चा माल व तयार दारू जप्त केली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10.10 वाजण्याच्या सुमारास यवत गाव हद्दीतील रायकर वस्ती, माटोबा तलावाच्या कडेला छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपी चेतन लक्ष्मण गुडदावत (रा. नाथाचीवाडी, ता. दौंड) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याचे आढळून आले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

या ठिकाणाहून पोलिसांनी सुमारे 500 लिटर कच्चे रसायन, 35 लिटर तयार गावठी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरली जाणारी साधने जप्त केली आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 23 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 312/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 123 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ख), (ग), (च) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची फिर्याद पोलीस हवालदार रामदास ज्ञानदेव जगताप यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार खोमणे करत आहेत.

पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला असून परिसरात बेकायदेशीर दारू निर्मितीविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.