Breaking Ticker

अ‍ॅड. राम रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात 'जेवण टिफिन'चे वाटप.




शहादा प्रतिनिधी (प्राध्यापक गणेश सोनवणे)

    शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख अ‍ॅड.राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहादा येथे एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. मंगळवारी दि. ७ रोजी शहादा तालुका जनसंपर्क कार्यालयात गरजू पुरुष व महिला मजुरांना जेवणाच्या टिफिनचे वाटप करण्यात आले. 

     राजकीय उत्सवापेक्षा सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत शिवसेनेने हा वाढदिवस साजरा केला.हा उपक्रम शिवसेना तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता. शहादा परिसरात पपई, केळी, मिरची तोडणी तसेच इतर मजुरीच्या कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने कामगार येत असतात. या कष्टकरी मजुरांना कामाच्या ठिकाणी घरून जेवण नेणे अनेकदा शक्य होत नाही. हीच अडचण ओळखून या मजुरांना सकस 'तीन ताली' जेवणाचे टिफिन वाटप करण्यात आले.शहादा शिवसेना जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल, शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे, जिल्हा युवासेना उपप्रमुख राजरत्न बिरारे,डॉ. राजेंद्र पेंढारकर,जयेश निकम, गोपाल कोळी, लक्ष्मण पवार, कौस्तुभ मोरे, जगदीश ठाकरे, अशोक वसावे, कल्पेश डांगळे, विजय गायकवाड, आप्पा नगराळे, नंदू चव्हाण, यतीश पाटील आदींची उपस्थिती होती.केवळ हार-तुरे आणि बॅनरबाजीला फाटा देऊन थेट गरजूंच्या मदतीला धावून जाण्याच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मजुरीसाठी वणवण करणाऱ्या कामगारांना या टिफिन वाटपामुळे मोठा दिलासा मिळाला. समाजाभिमुख उपक्रमातून वाढदिवस साजरा करणे ही संकल्पना इतरांसाठीही प्रेरणादायी आहे,अशा भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.