प्रतिनिधी:गणेश दिवेकर-
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 31 मार्च 2026 रोजी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास पुणे–सोलापूर महामार्गावरील धायगुडेवाडी (ता. दौंड) परिसरात नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला होता.
या कारवाईत आरोपी शाकीर शब्बीर पानसरे समाधान शिवाजी दाभाडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून 29.600 किलो गांजा (किंमत अंदाजे 14.50 लाख रुपये) तसेच 5.50 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी बलेनो कार असा एकूण 20.30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हा हा NDPS Act 1985 अंतर्गत कलम 8(ब), 20(इ) तसेच Bharatiya Nyaya Sanhita 2023 कलम 3(5) प्रमाणे नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी म्हणून पोलीस हवालदार गुरुनाथ युवराज गायकवाड यांनी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. सदर कारवाई महेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
