Breaking Ticker

शहादा पोलिसांची धडाकेबाज कारवाई



शहादा प्रतिनिधी 

       गोपनीय माहितीच्या आधारे शहादा पोलिसांनी शहरात धाड टाकत बेकायदेशीर मद्यसाठ्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ₹5 लाख 14 हजार 800 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहादा शहरात अवैधरीत्या मद्य साठवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खात्री करून पोलिसांनी सापळा रचत अचानक छापा टाकला. यावेळी विविध प्रकारचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

         जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 500 ml व 750 ml क्षमतेच्या बिअरच्या बाटल्या तसेच देशी ‘टॅगो पंच’ 90 ml च्या सुमारे 500 बाटल्यांचा समावेश असून एकूण 5 लाख 14 हजार 800 रुपये किमतीचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या पथकाने केली. या पथकात पीएसआय विनोद पाटील, अश्विनी सानप, पोलीस हवालदार योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप वाघ, शिवाजी शिरसाट आणि नारायण कानडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

पोलिसांनी अत्यंत शिताफीने ही कारवाई यशस्वी करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.


        शहादा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.