प्रतिनिधी शहादा (प्रा. गणेश सोनवणे)
नागरिक वयस्कर असतात. त्यांना सर्वांच्या मदतीची गरज असते. त्यासाठी जेष्ठ नागरिक संघाची निर्मिती सर्वत्र झाली आहे. संघ तयार झाला म्हणजे, पदे आली. पद स्वीकारले तर प्रामाणिकपणे व मेहनतीने काम केले पाहिजे. काम करताना कायद्याच्या वापर न करता प्रेम व नम्रता यांच्या वापर केला तर ते काम यशस्वी होते. असे उद्गार नंदुरबार जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांनी काढले. प्रकाशा येथील केदारेश्वर तीर्थस्थानी प .प. दगा महाराज यांच्या आश्रमात नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे अध्यक्ष अॅड. गोविंद पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण, उपाध्यक्ष मोहन चौधरी, तालुका संघाचे अध्यक्ष प्रा. जे. डी.पाटील, प्रकाशा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, धुळे विभागीय संचालक रामजी पाटील, वडाळी महिला जेष्ठ नागरी संघाचा अध्यक्षा मीराबाई सोनवणे, तळोदा महिला जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षा रशिलाबेन देसाई, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव गजानन विसपुते, ज्येष्ठ नागरिक जिल्हा आरोग्य समितीचे संचालक के.डी. गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेला साने गुरुजींची प्रार्थना खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने सुरुवात झाली. कार्यक्रमास उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचा शाल, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. नंतर प्रकाशा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, शहादा तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. जे.डी.पाटील , धुळे विभागीय संचालक रामजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. सभेला मणिलाल पाटील, आनंदराव विसपुते, भीमराव साळुंके, रतिलाल पाटील, रमेश पाटील, मार्तंड भामरे, राधेश्याम सोनार, रवींद्र मगरे, काशिनाथ चौधरी, तुकाराम लांबोळे, शकुंतलाबाई पाटील, आशाबाई चव्हाण, गुलाबराव पाटील, रघुनाथ बेलदार सर, मंगल भाई चौधरी व शहादा, मंदाणा, वडाळी, म्हसावद, नंदुरबार, तळोदा, प्रकाशा, लोणखेडा येथील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात जेष्ठ नागरिक के.डी .गिरासे यांनी जिल्हा सभेची ध्येय,उद्दिष्टे यांचे स्पष्टीकरण केले. नंदुरबार जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांनी नंदुरबार जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाची कार्यकारणी घोषित केली
.त्या कार्यकारणीस सर्वानुमते मते मंजुरी देण्यात आली. अध्यक्षीय भाषणात अॅड. गोविंद पाटील म्हणाले, मी वडिलांची प्रेरणा घेऊन या आश्रमात सर्वांची सेवा केली आहे, सेवा करत असताना समाजसेवेचे वृत्त हाती घेतले. ते मी प्रामाणिकपणे केले. त्यामुळे आज मी वयाच्या 87 वर्षी सुद्धा सर्व कामे स्वावलंबनाने करतो. आपण सुद्धा स्वावलंबनाने जीवन जगा असा संदेश त्यांनी शेवटी दिला. नंतर पसायदान व पुष्पांजली संघाचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांनी म्हटले. आश्रमाचे प्रमुख मोहन पाटील यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यांचे व उपस्थितांचे आभार के.डी. गिरासे यांनी मानले
