शहादा प्रतिनिधी (प्रा. गणेश सोनवणे)
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेची २०२५-२०२६ मध्ये गठित शहादा तालुका व नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी शहादा तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा उपप्राचार्या प्रा.सौ. कल्पना पटेल होत्या सर्वप्रथम शहादा तालुका संघटनेचे सचिव प्रा अनिल जगदाळे यांनी सभेचे प्रोसेडिंग व इतिवृत्ताचे वाचन केले.व सभेसाठी घेतलेल्या विविध विषयाला मंजुरी देण्यात आली नंदुरबार जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा गणेश सोनवणे यांनी शहादा तालुका कार्यकारणी सदस्यांना मार्गदर्शन केले व संघटनेतील तालुक्यातील सदस्यांच्या सर्व अडचणी समजून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी ग्वाही दिली. सभेत नवीन सभासद वाढविण्यासाठी आवाहन करण्यात आले.
शासनाने नुकतेच दिलेल्या पटपळताळणीच्या परिपत्रकावर चर्चा करण्यात आली. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी ११ वी निकालाच्या अंतिम कामातच शिक्षकांना पटपडताळणीला सामोरे जाणे जिकरी चे ठरणार आहे. गॅस पुरवठ्या अभावी आदिवासी बहूल भागातील वस्तीगृहे ओस पडली असून विद्यार्थी गैरसोयीमुळे गावाकडे गेले आहेत. अशा अडचणी सदस्यांनी व्यक्त केल्या. टप्पा अनुदानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील थकीत हप्ते, राष्ट्रीय पेन्शन योजना व त्यावरील विकल्पानवर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी शहादा तालुका अध्यक्ष व नंदुरबार जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा व्ही.सी. डोळे शहादा तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे उपाध्यक्ष प्रा एन. डी.निझरे प्रा मनोहर जाधव, सचिव प्रा. अनिल जगदाळे कोषाध्यक्ष प्रा.एस .बी.पवार, प्रसिद्धी प्रमुख प्रा.एल.पी .मोरे व सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. संघटनेत संघभावना महत्वाची असून सर्व सदस्यांना सोबत घेऊन आगामी काळात संघटित होऊन आपल्या न्याय्य मागण्या व हक्कासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा प्रा.सौ. कल्पना पटेल यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तालुका संघटनेचे सहसचिव प्रा. मनोज चौधरी यांनी मानले
