Breaking Ticker

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन



(प्रतिनिधी - योगेश मेश्राम)

 भीमाची लेकरं ऑर्गनायझेशन, नागपूर (महाराष्ट्र) तर्फे प्रज्ञासूर्य, बोधिसत्व व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ऑनलाइन अभिवादन व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम गुगल मीट द्वारे सायंकाळी ७.०० वाजता उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रामदास लिहितकर (ग्रंथपाल, शासकीय विज्ञान संस्था, नागपूर) हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगेश वागदे यांनी प्रभावीपणे केले, तर प्रास्ताविक डॉ. अमोल मेश्राम यांनी सादर केले. प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय डॉ. बालाजी लातुरे यांनी करून दिला.या कार्यक्रमात दोन महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.पहिल्या सत्रात डॉ. चंद्रशेखर गायकवाड (विद्यापीठ ग्रंथपाल, पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला) यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि वर्तमान परिस्थिती” या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी आजच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थितीत आंबेडकरांच्या विचारांची उपयुक्तता अधोरेखित केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृषीविषयक विचार उदाहरण देऊन वक्तव्य केले.दुसऱ्या सत्रात डॉ. संघमित्रा पाचपिंडे (प्रोफेसर, मा. श्री. अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले) यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण व कृती” या विषयावर सखोल विवेचन केले. त्यांनी आंबेडकरांच्या विचारांचे आचरण जीवनात कसे उतरवावे याबाबत मार्गदर्शन केले.डॉ. लिहितकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्याचे सखोल अभ्यासपूर्ण मत व्यक्त मांडले आणि आजची स्थिती यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पल्लवी ढोके (नवी मुंबई) यांनी आभार प्रदर्शन केले.या ऑनलाइन कार्यक्रमास विविध क्षेत्रातील शिक्षक, ग्रंथपाल व आंबेडकरी विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  नियोजन डॉ. दिलीप पाटील, डॉ. संजय रायबोले, डॉ. चंद्रमणी गजभिये आणि संपूर्ण भीमाची ऑर्गनायझेशन टीम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल आयोजक संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.