शहादा प्रतिनिधी
शहरातील विकास हायस्कूलचा प्रांगणात शनिवारी (ता.४) सायंकाळी सात वाजता ‘एक शाम खाटू नरेशजी के नाम’ वर आधारित श्री खाटू श्याम बाबाजी यांच्या भजन संध्येच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
येथील भक्तिमार्ग सेवा समिती, श्री श्याम सेवा समिती, पतंजली योग समिती, जायंट्स परिवार शहादा व अभिजीत दादा मित्र परिवारातर्फे शहरातील विकास हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी (ता.४) एप्रिलला सायंकाळी सात वाजता हा श्री खाटू श्याम बाबांच्या भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. कार्यक्रमात दरबार सेवा श्री श्याम सुंदर सरकार ऊन नरेश देणार आहेत तर संगीतकार कार्तिक जैन म्युझिकल ग्रुप इंदोर, भजन संध्याचे सुप्रसिद्ध गायक शुभम सेन (महू) व गायिका गुणगुण व गुंजन तिवारी (तिवारी सिस्टर) शहागंज मध्य प्रदेश हे श्री खाटू श्याम बाबांचे भजने सादर करतील. प्रथमच आयोजकांच्या आग्रहास्तव गुनगुन व गुंजन या तिवारी बहिणी नवकार मंत्राचा सराव करत असून, या श्याम संध्या भक्ती कार्यक्रमात प्रथमच नवकार मंत्र जय श्री श्याम जय महावीर गुंजणार आहे. उपस्थितीचे आवाहन ‘करने वाला श्याम कराने वाला श्याम’ या आयोजकांनी केले आहे.
