शहादा प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामपंचायत कोंढावळ व सुयश हेल्थकेअर यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच कोंढावळ गावातील ग्रामपंचायत येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या मध्ये आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या तीन हजार ते पाच हजार किमतीच्या तपासण्या फक्त 250₹ मध्ये करण्यात आल्यात या मध्ये इसीजी, हिमोग्लोबीन, बीपी, शुगर ,बॉडी वॉटर लेव्हल, कॅल्शियम, अशा माने पासून तळ पाया पर्यंत 21 प्रकारच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. यावेळी गावातील ग्रामस्थांनी या शिबिरास चांगला प्रतिसाद दिला या शिबिराचे उदघाटन सरपंच गोपाल भिल, उसरपंच प्रतिनिधी गटनेते विनोद अहिरे, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी गोविंद गिरासे व गावातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपास्थित होते.
