Breaking Ticker

एक श्याम खाटू श्यामजी के नाम भजन संध्या कार्यक्रमातून भक्ती व अध्यात्माच्या जनसागर उसळला



प्रतिनिधी शहादा 

    येथील विकास हायस्कूल प्रांगणामध्ये प्रथमताच लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून एक शाम खाटू नरेशजी के नाम भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री खाटू श्याम बाबा जी की जय हो, हारे का सहारा बाबा श्याम हमारा, महाकाल की जय हो, जय जय श्रीराम सियाराम जय राम, नामाच्या जयघोषाने भक्तीच्या उत्सवाच्या सागर ओथंबून व्हायला निमित्त होते एक श्याम खाटू नरेशी जी के नाम या भजनसंद्याच्या या उत्सवात भक्ती अध्यात्म आणि उत्साहाच्या अनोखा संगम पाहायला मिळाला. 

      कार्यक्रमाची सुरुवात श्री खाटू श्यामजी प्रतिमेची पूजन व श्री गणरायाच्या आरती करून करण्यात आली भाविकांच्या मंदिरातील मध्य प्रदेश येथील शुभम सिंह आणि गुणगुण व गुंजन तिवारी या गायक व गायिकांनी आपल्या जय श्रीराम, ओम नमः शिवाय, शिव तांडव , नवकार मंत्र है प्यारा, हनुमान चालीसा, महाकाल की जय आणि श्री खाटू श्याम बाबाजी वर आधारित विविध संगीतमय भजनाद्वारे आपल्या सुमधुर आवाजाने भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले शुभम सिंह यांच्या शिवतांडव भजनामुळे भाविकांमध्ये वेगळ्या दिवसात संचारला होता सुमधुर आवाजातील भजनांवर भाविकांनी टाळ्यांच्या गजरात नृत्याच्या ठेका धरत संपूर्ण वातावरण हे भक्तिमय करून टाकले या भक्ती उत्साहात महिला भाविकांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. 

        तत्पूर्वी श्री खाटू श्यामजी नरेश यांच्या प्रतिमेची गंगोत्री निवासस्थानी नगराध्यक्ष अभिजीत पाटील व प्रीती पाटील यांच्या हस्ते पूजन करून वाजत गाजत खाटू श्यामजीच्या जयघोषणात कार्यक्रम स्थळे शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान भाविकांसाठी अखंडपणे महाप्रसादाचे आयोजन देखील केले होते तर विविध संघटनांच्या वतीने शीतपेय, दूध, बिस्कीटचे वाटप करण्यात आले होते नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनात या भक्ती उत्सवाचे नियोजन अतिशय शिस्तबद्धरीत्या पार पाडले शक्ति मार्ग सेवा समिती श्री श्याम सेवा समिती, पतंजली योग समिती, जायंट परिवार शहादा व अभिजीत दादा मित्रपरिवाराने या भक्ती संध्या उत्सवाचे आयोजन केले होते या उत्सवात विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. अभिजीत पाटील नेहमीच विविध धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण शहादा नगरीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असणारे देवी देवतांचे उत्सव सादरीकरण करून नागरिकांना शहाद्यातच भक्तिमय वातावरण तयार करून देतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.