पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया च्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पत्रकारांवर होत असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी, पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न, तसेच शासकीय माहिती अधिकृत व वेळेत उपलब्ध होण्याची गरज या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात येत आहे. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण आणि कामकाज सुलभ करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.या धरणे आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असून, जिल्ह्यातील पत्रकार एकजुटीने आपला आवाज बुलंद करणार आहेत.
