Breaking Ticker

ना.मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिंतूरमध्ये भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा



जिंतूर :8/4/2026 छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळ, जिंतूर यांच्या वतीने मा. मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य व्हॉलीबॉल (Passing) स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. 10 व 11 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन मा. मेघना दिदी साकोरे बोर्डीकर (पालकमंत्री परभणी जिल्हा) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब राहणार आहेत. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद परभणीच्या अध्यक्षा मा. सौ. लताताई विजय वाकळे यांची उपस्थिती लाभणार आहे.

दि. 11 एप्रिल 2026 रोजी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर रावजी बोर्डीकर (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर) राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सचिन उर्फ मुन्ना गोरे (माजी नगराध्यक्ष तथा गटनेता, नगर परिषद जिंतूर) तसेच डॉ. पंडित दराडे (जिल्हा सरचिटणीस, भाजपा व संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष) उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ₹21,000, द्वितीय ₹11,000, तृतीय ₹7,000 व चतुर्थ ₹5,000 अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय उत्कृष्ट खेळाडूंना विशेष पुरस्कार व उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.या स्पर्धेदरम्यान विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन अँड.चंद्रकांत (अण्णा) बहिरट मा.नगरसेवक न.प जिंतूर तर नियोजन छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळ व स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले असून क्रीडाप्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.