Breaking Ticker

समस्त गुजर नाभिक समाज विभाग शहादा यांची सर्वसाधारण सभा व देवी उत्सव उत्साहात संपन्न



शहादा (प्रतिनिधी) – 

समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ , शहादा विभागाची सर्वसाधारण सभा व देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात व खेळीमेळीचा वातावरणात संपन्न झाला.

                     सालाबादराप्रमाणे चैत्र पौर्णिमेनिमित्त समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ , शहादा विभागाची सर्वसाधारण सभा व देवीचा उत्सव  संत सेना नाभिक समाज भवन, रामदेव बाबा नगर, शहादा येथे आयोजित आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा विभागाचे विद्यमान अध्यक्ष भुषण राजाराम पवार तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय गुजर नाभिक समाजाचे अध्यक्ष उद्धव मक्कन जांभळे , संत सेना समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक भबुता सोनवणे ,   शहादा नगरपालिकेच्या नगरसेविका सौ.ममता हेमराज पवार ,  आमदार राजेश दादा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक हेमराज  पवार , शिक्षण समितीचे  अध्यक्ष सुभाष सोनवणे  व  जयप्रकाश बहुदेशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाधव, संत सेना पतसंस्था , शहादाचे अध्यक्ष संजय जांभळे , समाज पंच मंडळाचे पदाधिकारी कार्यकारणी सदस्य संत सेना नवरात्र उत्सव मंडळ, संत सेना गणेश मंडळ व संत सेना फाऊंडेशन , गोकर्णेश्वर महादेव मंदिर , विरभाई कोतवाल फाऊंडेशन  तळोदा , साई सेना गणेश मंडळ असे समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी , सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

           प्रारंभी नाभिक समाजाची कुलस्वामिनी लिंबच माता व आराध्य दैवत संत सेना महाराज यांची प्रतिमा पूजन  व आरती करण्यात आली.याप्रसंगी शहादा  विभागाचा वतीने समाजातील पहिली नगरसेविका म्हणून ममता हेमराज पवार यांना समाज-रत्न पुरस्कार व सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी  अशोक भबुता सोनवणे यांना समाज- भुषण तसेच भूषण राजाराम पवार रा.तळोदा यांना युवा-प्रेरणा पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला याशिवाय नवरात्र उत्सव मंडळ यांचा वतीने गुजर नाभिक  समाजात पहिल्या नगरसेविका ममता हेमराज पवार समाज गौरव पुरस्कार आणि युवा-नेतृत्व पुरस्कार  भूषण राजाराम पवार यांना देऊन गौरविण्यात आले.

       या सर्वसाधारण सभेत  नवीन उपक्रम राबविण्यात आला  असून समाजात जे आपल्या आयुष्याची ७५ वर्ष पूर्णकरून अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे व आपल्या आयुष्यात कष्टाळू वृत्तीने, समाजभिमुख कार्याने आणि आदर्श जीवनमुल्यांची समाजाला प्रेरणा दिली आहे अशा ज्येष्ठ समाजसेवकांच्या योगदानाची दखल घेऊन समाजाच्या वतीने हिरालाल बोरदेकर , उध्दव मक्कन जांभळे यांच्या सह ५२ ज्येष्ठ समाज बांधवांना समाज - गौरव पुरस्कार स्वरूपात प्रमाणपत्र , भगवतगीता आणि भगवान श्रीरामाचा स्कार्फ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सिटीईटी या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जगदीश सोलंकी यांना गौरविण्यात आले.                                सर्वसाधारण सभेत समाजाच्या प्रगतीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. युवकांना प्रोत्साहन देणे , सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणे आदी  विकास उपक्रमांवर चर्चा करून समाज हिताचे ठराव मंजूर करण्यात आला .      यावेळी उद्धव जांभळे, प्रा. सुभाष सोनवणे, ममता पवार , प्रा.डॉ. अनिल साळुंके , अशोक सोनवणे, हिरालाल बोरदेकर , जगदीश सोलंकी , परमेश्वर चव्हाण ,  हेमराज पवार  यांनी मनोगत व्यक्त केले .                              या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भुषण पवार , सूत्रसंचालन  विभागीय प्रसिद्धी - प्रमुख प्रा. गणेश कन्हैया व आभार संजय बोरदेकर यांनी केले. सभेच्या यशस्वितेसाठी   विशेष सहकार्य शहादा विभागीय पंच व कार्यकारणी सदस्य व समाजबांधव यांनी केले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.