Breaking Ticker

अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायतचे मूल्यमापन करणाऱ्या समितीवर पत्रकार ओमकार सोनटक्के यांची नियुक्ती



कमलाकर वाघमारे जळकोट प्रतिनिधी,

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ' या अंतर्गत पंचायत समिती पातळीवरील उत्कृष्ट ग्रामपंचायतला पुरस्कार दिला जातो . या ग्रामपंचायतीची पाहणी करण्यासाठी तालुकास्तरावर समिती गठित करण्यात येते , जळकोट पंचायत समितीमध्ये देखील गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय मूल्यमापन समिती स्थापन करण्यात आली असून , या समितीवर अक्कलकोट तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे मूल्यमापन करणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा समितीवर एकमतचे जळकोट तालुका प्रतिनिधी ओमकार सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे . 

    अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांची तपासणी करण्यात येणार आहे .  गटविकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय मूल्यमापन समिती स्थापन करण्यात आली आहे . या समितीमध्ये .अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी ऐश्वर्या चितारी यांनी 

सदस्य म्हणून विस्तार अधिकारी पंचायत श्री पटवारी एन. ए. , विस्तार अधिकारी सांख्यिकी पंचायत समिती जळकोट शृंगारे ए . जी , अंगणवाडी पर्यवेक्षिका  श्रीमती बोईनवाड एम.पी. , वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती मुस्कावाड नितीन यांचा देखील या पथकामध्ये समावेश आहे . 

 महाराष्ट्र शासनाच्या वतीने  तालुकास्तरीय मूल्यमापनासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती, जळकोट यांना पंचायत समिती, अक्कलकोट जि. सोलापूर ही निश्चित करुन देण्यात आलेली आहे.  

  ग्रामपंचायतचे मूल्यमापन करणाऱ्या समितीवर पत्रकार ओमकार सोनटक्के यांची नियुक्ती झाल्याबद्दल पंचायत समितीचे सभापती सौ.सुनिता कोळंबे , उपसभापती श्री माधव  वाघमारे,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नाना पवार, प्रेस संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव होनराव, अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष  राजकुमार धुळशेट्टे ,  व्हॉइस ऑफ मीडिया  संघाचे अध्यक्ष अमोल कळसे, पत्रकार नामदेव केंद्रे, ज्येष्ठ पत्रकार एम .जी मोमीन, शिवशंकर काळे, विवेक पोतदार, अजिज मोमिन, अनंत धुळशेट्टे ,  संगम डोंगरे , कैलास पाटील , माधव होणराव, मारोती फुलारी, महेश देशमुख , नामदेव राठोड, कमलाकर वाघमारे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव हनुमंत केंद्रे , उपाध्यक्ष राम चोले, माधव केंद्रे , पत्रकार अंबादास गणुचे, विश्वनाथ काळे , ओमकार टाले, सुखानंद सोनटक्के ,  यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकारांनी अभिनंदन केले आहे .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.