Breaking Ticker

जळकोट पंचायत समिती कार्यालय येथे पंचायतराज दिन उत्साहात साजरा



पंचायतराज व्यवस्थेला बळकट करण्यासाठी लोकशाहीचे विकेंद्रीकरण वाढवणे हा पंचायत राज दिनाचा मुख्य उद्देश : उपसभापती प्रा. माधव वाघमारे. 


 प्रतिनिधी,जळकोट

भारतात पंचायतराज ची स्थापना दि, २ ऑक्टोबर १९५९ रोजी त्यावेळी  बलवंतराव मेहता जनक होते. तर महाराष्ट्रात १ मे १९६२ पासून यशवंतराव चव्हाण समितीच्या शिफारशीनुसार ही व्यवस्था लागू करण्यात आली. भारतात दि, २४ एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. सन १९९२ च्या ७३ व्या घटनादुरुस्तीव्दारे १९९३ पासून पंचायत राज व्यवस्थेला संवैधानीक दर्जा मिळाल्याच्या स्मरणात हा पंचायत राज दिवस साजरा केला जातो. असे जळकोट पंचायत समिती चे उपसभापती प्रा. माधव वाघमारे यांनी पंचायत समिती कार्यालयात आयोजित पंचायत राज दिनानिमित्तानी आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. 

          जळकोट पंचायत समिती सभागृहात आज दि, २४ एप्रिल २०२६ रोजी पंचायत राज दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळकोट पंचायत समिती चे सभापती सौ. सुनिता कोसंबे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती प्रा. माधव वाघमारे, पंचायत समिती सदस्या शिवकांता ताकबिडे, मीरा सुर्यवंशी, राहुल झोले, नुतन गटविकास अधिकारी श्रीमती ऐश्वर्या चितारी, सहायक प्रशासन अधिकारी सचिन काडवादे विस्तार अधिकारी निळकंठ पटवारी, जयवंत कोनाळे उपस्थित होते. 

        जळकोट पंचायत समिती चे नुतन गटविकास अधिकारी श्रीमती ऐश्वर्या चितारी, यांचा शाल, श्रीफळ,पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्या व सदस्य यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 

       पुढे बोलताना उपसभापती प्रा. माधव वाघमारे सांगितले की, भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दि, २४ एप्रिल २०१० रोजी पहिला राष्ट्रीय पंचायत राज दिन घोषित केला. पंचायत राज व्यवस्थेसाठी कलम ४० मार्गदर्शक तत्त्वे ग्रामपंचायतीच्या स्थापनेचा आदेश देते तर भाग ।× मधील कलम २४३ चे अंतर्गत संस्थाना घटनात्मक दर्जा देण्यात आला. पंचायत राज ची त्रिस्त्रीय रचना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, या विकासाच्या सर्वोच्च संस्था आहेत. म्हणून सर्व पंचायत समिती मधील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, सदस्य, पंचायत समितीला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी शासनाच्या सर्व योजनांचा जनतेसाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

      यावेळी जळकोट तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आपल्या गावासाठी आर. आर. पाटील, सुंदर गाव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीमध्ये मंगरूळ, चिचोंली, करंजी, शेलदरा, विराळ, येथील सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. 

         यावेळी आशिष यंगाले, आनंद शृगारे, निखिल पांचाळ, नितीन मुस्कावाड, राजश्री स्वामी, लक्ष्मण ढोबळे, संभाजी केंद्रे, कोटगीरे, शांतवीर कासनाळे, शेख मौनोदीन, सुनील तोडसम, संजय घोरपडे, सीमा पेन्सनलवार, जिजामाता सिदंगीकर, बालाजी कदम, बाबर, सतीश हाळे, इंद्राळे, केंद्रे, नागरगोजे, सह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. 

         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जयवंत कोनाळे, यांनी केले तर आभार सहायक प्रशासन अधिकारी सचिन काडवादे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.