Breaking Ticker

खेतिया रोड चौकाचे संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक नामकरण*



प्रतिनिधी शहादा 

       शारदानगर पालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभे शहराच्या वैभवात भर घालणारा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की त्या रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील मुख्य चार रस्ता चौकाला आता संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक असे नवीन नाव देण्याच्या ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला आहे. 

    प्रभाग क्रमांक सहाच्या नगरसेविका भारतीय चव्हाण यांनी अनाम करण्याच्या प्रस्ताव सभेसमोर मांडला होता शहादा शहराच्या विस्तारणाऱ्या भागात आणि मुख्य रहदारीच्या याच्यावर संत रोहिदास महाराजांचे नाव देऊन त्यांच्या विचाराच्या वारसा जपावा अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रस्तावाला नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकमुखाने मंजुरी दिली. 

      नगरपालिकेने घेतलेला हा निर्णय अत्यंत गौरवास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे बोलले जात आहे. संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी आयुष्यभर समता बंधुता आणि मानवतेची शिकवण दिली त्यांच्या नावाने या चौकाला कायदेशीर ओळख मिळाल्यामुळे त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

सर्व समाजासाठी हा आजच्या गौरव दिन. बऱ्याच दिवसापासून मागणी व प्रतीक्षेत असलेलेले शहाद्यातील मध्यवर्ती चौक ज्यांचे नामकरण संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज व्हावे. संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या विचाराच्या वारसा हा पुढे नेण्यासाठी सर्व नगरसेवकांनी, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्षांनी सहकार्य करून जुने शहादे म्हणजेच कुकडेल व नवीन शहादे शहराला जोडणारा हा चौक आहे, यास संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक असे नामकरण करून एकोप्याच्या संदेश या माध्यमातून देण्यात आला --सुरेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते शहादा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.