अकील आफताब यांची जिल्हाध्यक्षपदी निवड; ५० पदाधिकाऱ्यांना साजिद अहमद यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरण
अमरावती / जळगांव (प्रतिनिधी आरिफ खान)
जिल्हा अमरावतीतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक प्रगती साधणे तसेच त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची माध्यमिक जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांच्या वतीने जिल्हाध्यक्षपदी मोहम्मद अकील आफताब मोहम्मद ग्यास, मरियम उर्दू ज्युनियर कॉलेज,नालसाहबपुरा, अमरावती यांची निवड करण्यात आली. तसेच ५० पदाधिकाऱ्यांना संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण विस्तार अधिकारी मीर मेहंदी अली होते.प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद उपस्थित होते. तसेच पाहुणे म्हणून वाशिम जिल्हाध्यक्ष हसीन देशमुख,सय्यद अजहर अली, सय्यद मसूद अली,माजी शिक्षण विस्तार अधिकारी, मोहम्मद ग्यास मोहम्मद हनीफ ,निवृत्त ए.डी.आय,नाजिम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमात जिल्हा कार्याध्यक्षपदी मोहम्मद जमीर मोहम्मद वजीर, सेक्युलर उर्दू हायस्कूल, अमरावती यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी अकील अहमद अब्दुल मजीद,अज़गर हुसैन उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, खोलापूर, मोहम्मद मुश्फिक मोहम्मद शकील ,उर्दू सैफी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, पॅराडाईज कॉलनी आणि सय्यद सज्जाद आग़ा सय्यद अली हुसैन अंजुमन उर्दू हायस्कूल, नंदगाव पेठ) यांची निवड करण्यात आली.बैठकीत जिल्हा सचिवपदी सैयद साकिब अली सैयद साबिर अली,सफा व मरवा उर्दू ज्युनियर कॉलेज, मुगलईपुरा, ्परतवाडा, जि. अमरावती यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच जिल्हा सहसचिवपदी मोहम्मद शाकिर मोहम्मद सादिक उर्दू सैफी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, पॅराडाईज कॉलनी, तनवीर अहमद अब्दुल सलाम ,ए.पी.जे. कलाम कॉलेज ऑफ सायन्स अँड व्होकेशनल, अचलपूर,आणि उज़ैर खान महोली जागीर यांची नियुक्ती करण्यात आली.बैठकीत संघटकपदी अतहर रोमन अब्दुल कलाम उर्दू सैफी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, पॅराडाईज कॉलनी, यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा कोषाध्यक्षपदी नावेद साकिब शहाबुद्दीन शेख,नियाजी उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज,असीर कॉलनी यांची निवड करण्यात आली.प्रसिद्धी प्रमुखपदी मिर्जा जहांगीर बेग,मरियम ज्युनियर कॉलेज,अमरावती आणि अॅड. कमर राज काझी फखरुद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली.महिला प्रतिनिधी म्हणून इशरत जहां ,असोसिएशन उर्दू हायस्कूल, चांदनी चौक, अमरावती, आणि अदीबा आफरीन काजी ,खैरुद्दीन उर्दू सैफी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, पॅराडाईज कॉलनी, अमरावती यांची निवड करण्यात आली.कायदेशीर सल्लागारपदी मीर मेहंदी अली सेवानिवृत्त विस्तार अधिकारी,शैक्षणिक सल्लागार म्हणून मोहम्मद ग्यास मोहम्मद हनीफ ,सेवानिवृत्त विस्तार अधिकारी, तसेच सल्लागार समिती सदस्य म्हणून मजहर अली गझंफर अली, सैयद मकसूद अली ,विस्तार अधिकारी,आणि नाजिम पटेल मुख्याध्यापक, जिल्हा परिषद, यांची निवड करण्यात आली.तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून जावेद सर भातकुली, शहजेब नंदगाव पेठ, मोहम्मद वसीमुद्दीन उर्दू सैफी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, पॅराडाईज कॉलनी, रिजवान काजी फ्रेंड्स उर्दू हायस्कूल) मोहम्मद एहसानुल्ला खान रिजवानुल्ला खान सोनिया गांधी स्कूल, वसीमुद्दीन सैय्यद हबीबुद्दीन नियाजी ज्युनियर कॉलेज, वसीम अख्तर अब्दुल करीमसफा मरवा कॉलेज, मोहम्मद इरफान,मरियम ज्युनियर कॉलेज, फरहान खान नजमा पटेल बबली, दर्यापूर, अब्दुल शहजादसैफी उर्दू ज्युनियर कॉलेज,असद खान नियाजी उर्दू हायस्कूल, अमरावती, यांची निवड करण्यात आली.यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने सुरू असलेले कार्य राज्यात अग्रगण्य असल्याचे नमूद केले व सर्व शिक्षकांनी संघात मोठ्या संख्येने शामिल व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन सय्यद साकिब, प्रस्तावना अकील आफताब आणि आभार प्रदर्शन मोहम्मद शाकीर यांनी केले.
