Breaking Ticker

खुलताबाद शासकीय रुग्णालयातील गैरसोयींवर नगराध्यक्ष संतापले


मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी

 त्रासदायक ऊकाडयात लसीकरण देणे   असलेल्या आणि आत्र समोर आला आहे पासून बंचित ठेवत लाट उसळली नेगराध्यक्ष आमेर पटेल  यांनी बुधवारी (दि. १३)पंख्यांची देखील व्यवस्था नसलेल्या ठिकाणी लसीकरण, आरोग्य तपासणी करण्यात येत होती.रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जुन्या इमारतीत जाऊन पाहणी केली असता तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आले. इमारतीत कोणत्याही प्रकारच्यामूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट दिसून आले. विशेष म्हणजे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पंख्यांचीसुद्धा व्यवस्था नसल्याने बालके उकाड्याने हैराण होत रडत असल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक गर्भवती महिलांना तासनतास घामाघूम अवस्थेत बसून तपासणीची

प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही समोर आले. विशेष म्हणजे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे समोर आले. सध्या राज्यभर उन्हाची तीव्रता वाढलेली असून तापमानाचा पारा बांगलाच चढला आहे. अशा परिस्थितीत लहान मुले, बालके आणि गर्भवती महिलांसारख्या संवेदनशील घटकांना योग्य सुविधा देण्याऐवजी कुन्या आणि असुविधाजनक इमारतीत आरोग्य सेवा सुरू ठेवण्यात आल्याने नगराध्यक्ष व नगरसेवकांनी तीव नाराजी व्यक्त केली. आरोग्यासी संबंधित सेवांमध्ये अशा प्रकारची हलगर्जीपणा अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

लसीकरणासाठी जुन्या इमारतीचा वापर

सदर इमारत यापूर्वी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासाठी वापरण्यात येत होती. इमारतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ती रिकामी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही काही महिला कर्मचारी या ठिकाणी लहान मुलांचे लसीकरण तसेच गर्भवती महिलांची तपासणी करण्यासाठी वापर करत आल्याचे समोर आले. आठवडयातील दर बुधवार दिवसी बालकांना डोस देण्यासाठी तर दर शुक्रवार दिवशी गर्भवती महिलांच्या त्पासणीसाठी हीच इमारत वापरण्यात येत असल्याचे पाहणीत उघड झाले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.