खुलताबाद तालुक्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद पंचायत समिती सभापती सुनीता खंडागळे यांनी गुरुवारी (दि.१४) धामणगाव, लोणी आणि दरेगाव या गारांना भेट देत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाणी केली. यावेळी त्यांनी विहिरींची उपासणी करून पाणीपुरवठ्याच्या सचा आढावा घेतला. सभापती खंडागळे यांनी गावातील नागरिकांची भेट घेतली
वाढत्या उन्हामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. पाणी समस्येचे तत्काळ निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. नियमित व सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनामार्फत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सभापती यांनी दिले. या पाहणी दौयावेडी संबंधित गावांचे संवादसण्यात सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
