Breaking Ticker

अज्ञात वाहनाच्या धडकेने पुणे सोलापूर महामार्गावर पाटस येथे बिबट्याचा मृत्यू


प्रतिनिधी राहुल दिवेकर

पाटस (ता.दौंड) दि.25मे2026- : पुणे सोलापुर महामार्गावर पाटस परिसरातील भागवतवाडी येथे रविवारी ( दि.24)रोजी पहाटे 4 च्या दरम्यान बिबट्याचा मृतदेह आढळला. बिबट्याच्या शरीरावर कुठेच जखम किंवा इतरत्र रक्तस्त्राव झाल्याचे दिसत नसल्यामुळे नागरिकांमधून बिबट्याच्या मृत्यू बद्दल संभ्रम निर्माण झाला.परंतु बिबट्याचा मृत्यु अपघाताने झाला असल्याचा अंदाज वनविभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला ,मृतदेह पाहण्यासाठी आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

तसेच सदर घटनास्थळी वन कर्मचारी लवकर न पोचल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला गेला.सदरील बिबट्याचा मृतदेह टोल प्रशासन रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी बाजूला घेतला. बिबट्याला जोराची धडक बसून अंतर्गत रक्तप्रवाह झाल्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या वतीने करण्यात आला. मृत बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षाचा असल्याचे वनविभागाच्या वतीने कळविण्यात आले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.