Breaking Ticker

कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या



दिग्रस - तालुका प्रतिनिधी

दिग्रस तालुक्यातील विठाळा गाव येथील शेतकरी नामे रोहिदास काळू चव्हाण वय 45 वर्ष याने रविवार दिनांक 24/5/2026 ला दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान आपल्या शेतात पेरणीपूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतात गेले  असताना . मागील कर्ज फिटले नाही.व यावर्षी पेरणीला सोय नाही या. विवंचनेत . तो सतत चिंतेत राहत होता. पेरणीसाठी कुठेच व्यवस्था होत नसल्याने. कंटाळून त्याने विष प्राशन केले.उपचारासाठी यवतमाळ येथे नेत असताना.वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.  सदर मृत शेतकऱ्यांच्या नावे दोन एकर शेती असून बँक ऑफ इंडियाचे एक लाख रुपये कर्ज आहे.आर्णी पोलीस स्टेशन से श्री जाधव साहेब यांनी पंचनामा करून. सौ विच्छेदनासाठी मृतदेह पाठविले आहेत्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व एक मुलगा अविवाहित असा परिवार आहे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.