मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी
खुलताबाद : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी खुलताबाद पोलीस ठाणाच्या वतीने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पांचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या प्रक्रल्यामुळे शहरासह वेरूळ परिसरातील सुरक्षेला मोठे बळ मिळणार अशून गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणे अधिक प्रभावी होणार आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाठ, मंत्री अतुल सावे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विनायकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी अपारजिता अग्निहोत्री, हर्षदा शिरसाठ, खुलताबाद नगराध्यक्ष आमेर पटेल, तहसीलदार संतोष गुट्टे, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे, नगरसेवक गजू फुलारे, एस. एम. कमर, अव्याज वेग, प्रसराम बारगळ, तोसिफ शेख, वजीद शेख, कैलास बारगळ, दिलीप बाविस्कर, इम्रान जगीरदार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरन्यान शहर सुरक्षा, गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांनीही सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
66 खुलताबाद शहरात बसविण्यात आलेले अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या यंत्रणेमुळे गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून संशयास्पद हालचालींवर पोलिसांना बारकाईने लक्ष ठेवता येईल, त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल.
पालकमंत्री संजय शिरसाठ 66 खुलताबादमध्ये उभाण्यात आलेली अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा ही शहराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. सार्वजनिक ठिकाणांवर चोवीस तास नजर ठेवली जाणार असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठ्या प्रमाणात आळा बसेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांना गुन्हयांचा तपास अधिक जलद आणि प्रभावीपणे करता येणार आहे. अतुल सावे संजय शिरसाठ पालकमंत्री विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक अपारजिता अग्निहोत्री पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत महाजन पोलीस निरीक्षक, खुलताबाद ग्रामीण भागातही विस्ताराची योजना ताबाद परिसरातील प्रमुख ग्रामीण मार्ग, टोल नाके आणि मोठ्या मावांनाही टप्प्याटप्प्याने या यंत्रणेशी जोडण्याचा विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. भविष्या देण्यात आली. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AJ) तंत्रज्ञानाचा 'स्मार्ट पोलीसिंग' प्रणाली विकसित करण्यांचे नियोजन असल्याचेही
मंत्री अतुल सावे १३२ अत्याधुनिक कॅमेन्यांचे जाळेया प्रकल्पांतर्गत खुलताबाद आणि वेरूळ शहरात एकूण ९३२ सीसीटीडी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.खुलताबाद शहरात ७७ कॅमेरे यामध्ये ७ एएनपीआर, १० पीटीझेड आणि २ मोटारसायकल नंबर प्लेट डिटेकशन कॅमेन्यांचा समावेश. वेरूळ शहरात ५५ कॅमेरे यामध्ये ९ एएनपीआर
कॅमेरे कार्यरत.कॅमेन्यांची झूम क्षमता सुमारेएक किलोमीटरपर्यंत.कंट्रोल रूममधून विविध ठिकाणी बेट सूचना देण्याची सुविधा.ऐतिहासिक स्थळे, बाजारपेठा आणि प्रवेशद्वारांवर विशेष लक्ष
पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दूटीने खुलताबाद व वेरूळमधील ऐतिहासिक व धार्मिक स्थळे, शहराचे प्रवेशद्वार, मुख्य बाजारपेठ, बसस्थानक, शैक्षणिक संस्था तसेच संवेदनशील चौक आणि गर्दीच्या रस्त्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करणे पोलिसांना शक्य होणार आहे.
सेंट्रल कंट्रोल रूम ठरणार 'कमांड सेंटर'
या संपूर्ण व्यवस्थेचे नियंत्रण सेंट्रल कंट्रोल रूममधून करण्यात येणार आहे. एखादी संशयास्पद हालचाल दिसताच गस्तीवरील पोलिसांना तात्काळ अलर्ट पाठविणे, बाहतूक कोडीवर लक्ष ठेवणे, अपघात किंवा आग यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचविणे यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.
तपासासाठी मोठी मदत
सीसीटीव्ही फुटेज हे न्यायालयीन प्रक्रियेत महत्वाचा पुरावा मानले जात असल्यांने गुन्हेगारांचा शोध घेणे अधिक सोपे होणार आहे. नंबर प्लेट रेकनिशन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे संशयित वाहनांचा माग काठणे आणि आरोपींची ओळख पटविणे अल्पावधीत शवन्य होणार आहे.
नागरिकांना सहकयांचे आवाहन
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आलेल्या कॅमेन्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. व्याधारी आणि घरमालकांनी स्वतःचे खाजगी सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य रस्त्याकडे ठेवून पोलिसांना सहकार्य करावे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.
