नवनियुक्त पो. नि. महाजन यांनी खुलताबाद पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला
मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी
खुलताबाद खुलताबाद पोलिस ठाण्याचे पो. नि. धनंजय फराटे यांचे कलयाण येथे स्थानांतर झाले असून त्यांना गुरूवारी नागरिकांकडून निरोप देण्यात आला. तर कल्याण येथून नवनियुक्त पो. नि. प्रशांत महाजन यांनी खुलताबाद पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचेही स्वागत करण्यात आले.
या सत्काराप्रसंगी प्रामुख्याने एजाज अहमद, शरफोद्दीन मोहम्मद रमजानी, माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन, नगरपालिकेचे गटनेते गजानन फुलारे, नगरसेवक मुनीबोद्दीन, सलीम जहांगीरदार, कैलास बारगळ, मोहम्मद मतीन, माजी नगरसेवक तालिब कुरैशी, फिरोज अहमद, फैजान बेग आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांनी नूतन पो. नि. महाजन यांना शहराचा गौरवशाली इतिहास आणि धार्मिक महत्त्वाविषयी माहिती दिली.
खुलताबाद हे अतिशय संवेदनशील आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असल्याने, येथील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आणि जनता यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महाजन यांनीही शहराच्या परंपरेचा मान राखून काम करण्याचे आश्वासन दिले.
खुलताबादमधील सर्वधर्मीय एकोपा आणि 'कौमी भाईचारा' जपण्यासाठी पोलिस प्रशासनाला नेहमीच सहकार्य लाभले असून, भविष्यातही हे सहकार्य कायम राहील, असे मान्यवरांनी आपल्या भाषणात नमूद केले. पो. नि. धनंजय फराटे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती
