Breaking Ticker

खुलताबाद नगर परिषदेकडुन कचरा वेचकांची कार्यशाळेचे आयोजन सिओ शेख समीर यांनी केले मार्गदर्शन


मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी

खुलताबाद : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत खुलताबाद येथे नगरपरिषद कचरा वेचकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कुशाग्र फाउंडेशन यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यशाळा नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सिओ) शेख समीर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.शहरातील स्वच्छता व्वस्थेला अधिक सक्षम शाशवत व पर्यावरण पुरक बनविण्यासाठी या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.

कार्यशाळेत केरकचरा वेचकांना आधुनिक घनकचरा व्यवस्थापन ची सखोल माहिती देण्यात आली. कामात कार्यक्षमता गुणवत्ता वाढविण्यासाठी व सुरक्षा साठी उपाय योजना या वेळी सांगण्यात आल्या.

कचरा संकलन साठवण वाहतूक व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तर ओला सुका कचरा व घातक कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे व त्याचा पर्यावरण संवर्धन व रिसायकलींग प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. तर विविध तंत्रज्ञानातून कचऱ्या पासून खत उर्जा व इतर उपयुक्त पदार्थ निर्मिती करण्यासंदर्भात उपाययोजनाची यावेळीकार्यशाळेत माहिती मार्गदर्शन करण्यात आले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.