Breaking Ticker

यावल तालुक्याचा नविन गटशिक्षणाधिकारी पदी फिरोज पठाण आज स्वीकारला पदभार



जळगांव  प्रतिनिधी आरिफ खान 

श्री फिरोज पठाण उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद जळगांव  यांची  यावल तालुक्याचा नवीन   गटशिक्षणअधिकारी म्हणून शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली होती.आज दिनांक ०५/०५/२०२६ मंगळवार रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला. यावल तालुक्याच्या माजी 

गटशिक्षणाधिकारी श्री विश्वनाथ धनके हे प्रदीर्घ सेवेनंतर  दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी नियत   वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते म्हणून त्यांची जागी श्री  फिरोज पठाण यांची यावल तालुक्याचा गटशिक्षण अधिकारी पदी  नियुक्ती  करण्यात  आली होती.त्यांच्या नियुक्तीमुळे सकारात्मक बदलांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे .श्री फिरोज पठाण यांना 

उपशिक्षणअधिकारी (प्राथमिक)  पदाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे  त्यांच्या नेतृत्वाखाली यावल तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व्यजस्थेत नक्कीच सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.  दरम्यान त्यांच्या नियुक्तीबद्दल  शिक्षक, शिक्षणप्रेमी व स्थानिक नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे आज दिनांक ०५/०५/२०२६ मंगळवार रोजी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे यांनी श्री फिरोज पठाण यांचे सत्कार केले. याप्रसंगी भुसावळ माध्यमिक पतपेढी चे माजी उपाध्यक्ष श्री पी. एस. सोनवणे ,केंद्रप्रमुख शेख शाकीर,ग.स.चे संचालक सैय्यद  शफिक ,अमानुल्ला खान, अरशद पठाण,अमजद खान, मुख्तार अली, सुभाष पाटील व आनंद जाधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.