.
दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी
खूूलताबाद तालुक्यातील येसगाव येथील गिरजा मध्यम प्रकल्प या प्रकल्पातून सध्या फुलंब्री खुलताबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येसगाव येथील गिरजा मध्यम प्रकल्पातून सध्या कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अनियंत्रित विसर्गामुळे प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने घटत असून नागरिकांना आता मृतसाठ्यातील दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरजा प्रकल्पात काही दिवसांपूर्वी समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, पाटबंधारे विभागाकडून कोणतेही ठोस नियोजन न करता शेतीसाठी दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात येत आहे. सध्या शेतीसाठी पाण्याची तातडीची गरज नसतानाही होत असलेल्या या विसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
वरच्या स्तरातील स्वच्छ पाणी वाहून गेल्याने आता पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलपर्यंत गढूळ, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी पोहोचत आहे. या पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
टक्क्यांपेक्षा जास्त असताना त्याचे नियंत्रण पाटबंधारे विभागाकडे असते. मात्र, साठा ४० टक्क्यांखाली गेल्यानंतर तो पिण्यासाठी राखीव ठेवून नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले जाते. त्यामुळे काही अधिकारी जाणीवपूर्वक साठा कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, प्रकल्पातील सांडवा व कालव्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली खर्च करण्यात आलेल्या निधीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात ही कामे निकृष्ट दर्जाची किंवा केवळ कागदोपत्री असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच, कालव्याच्या शेवटच्या टोकाला काही प्रभावशाली व्यक्तींची शेती असल्याने त्यांच्या फायद्यासाठीच पाणी सोडले जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून पाण्याचा अनियंत्रित विसर्ग थांबवावा व स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी केली आहे. (यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पाटील वेताळ यांनी सांगितले की पाणीपुरवठा योजनेच्या ज्या वेळेपर्यंत घडवून पिवळसर दुर्गंधीयुक्त पाणी पोहोचत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आजाराचा धोका वाढत असून स्थानिक उपाय अभियंता यांनी लक्ष देऊन चौकशी करावी) शाखा अभियंता विठ्ठल शिंगारे यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की पूर्ण साफसफाई केली असून पाण्याची काही सध्या अडचण नाही अजून काही कामे बाकी आहे त्यासाठी आम्ही
