मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी
खुलताबाद तालुक्यात सध्या पेट्रो डिझेल वितरणाची स्थिती बिकट झाली असून, काही पेट्रोल पंप कधी बंद तर कधी सुरू या स्थितीत आहेत. त्यातच पंपावर वादविवादाच्या घटना वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत तालुक्यातील पेट्रोल पंपावर पोलिस बंदोबस्त देण्याबाबत तहसीलदार संतोष गुट्टे यांनी एका पत्राद्वारे आदेशित केले आहे. खुलताबाद शहराबाहेरील एका पेट्रोल पंपचालकाने
पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केलेली होती. खुलताबाद शहरातील दोन पेट्रोल पंपांव्यतिरिक्त तालुक्यातील वेरूळ, काठशिवरी, सुलतानपूर, बाजारसावंगी या ठिकाणी पेट्रोलपंप असून, वितरण व्यवस्थेतील त्रुटी पाहता, पेट्रोलपंप कर्मचारी व ग्राहक यांच्यात वाद होत आहेत. तालुक्यात सर्वांत जास्त त्रस्त शेतकरी असून खरीप हंगामाच्या तयारीला ब्रेक लागला आहे.
