प्रतीनीधी राजाराम लिपने
सेलू तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथे शेत रस्त्याच्या वादामुळे प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे .गट क्रमांक 220 व 221 मधील शेत जमीन रस्त्यावरून हा वाद तीन वर्षापासून चालू आहे
दि 22/05/2026 रोजी प्रशासनाच्या प्रतिनिधीनी घटनास्थळी भेट दिली .रस्ता खुला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त व जेसीपी सह नागरिक उपस्थित होते प्रतिवादी शंकर रामभाऊ लिपणे व नारायण तातेराव सोनपावले,नागनाथ विष्णुपंत सोनपावले,सुभाष विष्णुपंत सोनपावले हे शेतकरी उपस्थित नोटीस तालीम करूनही उपस्थित नव्हते .प्रशासनाने अपिलार्थी बाबासाहेब हरिभाऊ लिपणे यांच्या बाजूने तिसरी नोटीस बजावली आहे त्यात 7 दिवसाच्या आत शेत रस्ता मोकळा करण्याचा आदेश आहे .दोन्ही बाजूच्या नियमावर प्रशासक कडक आहे .तर प्रशासनाच्या नियमानुसार शेत रस्ता मोकळा करून ठेवणे सर्वोच्च प्रधान आहे .या वादाचा निकाल लवकरच येईल .अशी अपेक्षा आहे कारण पावसाळ्याच्या आगमनापूर्वी शेतरस्ता मोकळा करणे आवश्यक आहे .घटनास्थळी नायब तहसीलदार इनामदार, मंडळ अधिकारी नांदापूरकर,तलाठी मोताळे, पोलीस प्रशासक एस व्ही जाधव,एम बी कुलथे, दराभाऊ नाटकर ( पो .पा ) ,ज्ञानेश्वर लिपणे,उद्धवराव लिपणे,रामकिशन लिपणे,सत्यनारायण लिपणे,सुशांत लिपणे,सुनील लिपणे,अण्णासाहेब लिपणे,सर्जेराव लिपणे,,मोकीन लीपने हे या ठिकाणी उपस्थित होते
