Breaking Ticker

खुलताबाद येथील पत्रकारांवर खोटे गुन्हे; पत्रकारांवरील खोटे गुन्हे तत्काळ माघे घेण्यात यावे : नजीमोद्दीन काजी



मुख्यमंत्री यांना निवेदन, निष्पक्ष चौकशीची मागणी


मुनीर अब्बास शाह  बाजार सावंगी

खुलताबाद तालुक्यातील व जिल्ह्यातील खुलताबाद तालुका व शहरातील पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या गुनांबाबत आता प्रकरण गंभीर वळणावर आले असून, या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नजीमोद्दीन काजी यांनी हे निवेदन मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे की, खुलताबाद परिसरातील पत्रकार विविध दैनिके व वृत्तवाहिन्यांमधून कार्यरत राहून भ्रष्टाचार, अन्याय व अवैध कृत्यांविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर काही स्वार्थी घटकांकडून पत्रकारांना लक्ष्य करत खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेषतः सराई परिसरातील अवैध गौण खनिज (मुरूम) उत्खनन प्रकरणात पत्रकार हुसैन पटेल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर तहसील प्रशासनाने कारवाई केली होती. मात्र, या कारवाईचा राग मनात ठेवून काही लोकानी संबंधित पत्रकारावर खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे चार / पाच पत्रकारांवर गुन्हे दाखल झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. अशा परिस्थितीत सत्य मांडणाऱ्या पत्रकारांवरच दवाव टाकणे व त्यांना गुन्ह्यांत अडकवणे ही लोकशाहीसाठी धोक्याची वाव असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्य मागण्या

पत्रकारांवर दाखल सर्व कथित खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, भविष्यात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत, याची प्रशासनाने हमी द्यावी. पत्रकारांविरोधातील तक्रारींची सखोल पडताळणीकरूनच कारवाई करावी.

या प्रकरणात तातडीने न्याय मिळाला नाही, तर पत्रकार संघटनांकडून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. आता या निवेदनावर शासन व प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.