Breaking Ticker

रिसोड पि.यू.मापारी यांची वाशिम जिल्हाध्यक्षपदी चौथ्यांदा बिनविरोध निवड



  प्रतिनिधी धनंजय माळेकर 

दि.१६/५/२०२६ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळ अधिकारी यांची आमसभा घेण्यात आली. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मंडळ अधिकारी यांची कार्यकारिणी नव्याने निर्माण करण्यासाठी या आमसभेध्ये मध्ये विषय घेण्यात आला. त्यामध्ये पि.यू. मापारी मंडळ अधिकारी आपल्या कर्तुत्वगुनाने व आपल्या गोडवाणीने सर्व मंडळ अधिकारी व सहकारी यांना आपल्या कवेत घेतले. त्याचीच प्रचिती आज घेतलेल्या आमसभेत आली. सविस्तर असे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळ अधिकारी यांची आमसभा घेण्यात आली त्यामध्ये अनेक विषय घेण्यात आली व आमसभेचा मुख्य विषय टप्प्यावर येऊन पोहोचला त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कार्यकारिणीची नव्याने निवड घेण्यात यावी असे घोषित केले. त्यामध्ये ""अहंकाराचा वारा मज न लगे"" या उक्तीप्रमाणे पि.यू. मापारी मंडळ अधिकारी यांना या पदाचा कधी अहंकार झाला नाही. त्यामुळे सातत्याने त्यांची वाशिम जिल्हा मंडळ अधिकारी पदी चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली. याचे स्वागत वाशिम जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी यांनी त्यावेळी केले व याचे या क्षेत्रातील व त्याच्या चाहत्यांनी स्वागत केले. त्यांच्या निवडीमुळे सर्व मंडळातील सहकाऱ्यांना आनंद झाला. ही सभा वाटाणे लॉन्स येथे संपन्न झाली. या कार्यकारणीची निवड पुढील प्रमाणे पियू मापारी -मंडळ अधिकारी जिल्हाध्यक्षपदी निवड, उपाध्यक्षपदी- गजानन इप्पर,व निलेश गुगळे व सचिवपदी-संजय रायतकर, कोषाध्यक्षपदी- संजय बोरकर, सहसचिव - वामन नवघरे यांची पुढील कार्यकाळासाठी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे सर्व मंडळींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन ही सभा सामोपचाराने संपन्न झाली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.