प्रतिनिधी, कमलाकर वाघमारे
आज दिनांक 28 मे रोजी जळकोट शहरातील पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या काही दिवसापासून जळकोट तालुक्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलचा तुकडा दिसून येत आहे आज जळकोट येथील पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत अनेक वाहनधारकांना रात्रभर पंपावर थांबूनही डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे.
सध्या शेतकरी पेरणीपूर्वी मशागती कामात व्यस्त आहेत शेतीचे बरेच काम यांत्रिकीकरणावर अवलंबून असल्याने ट्रॅक्टर व इतर यंत्रांना डिझेलचा पुरवठा अत्यावश्यक आहे मात्र पुरवठा खंडित झाल्याने शेतीचे कामे ठप्प होण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत शासनाच्या निष्क्रियतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शेतकरी व अन्य वाहनधारक करत आहेत शासनाने जळकोट तालुक्यात तातडीने पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे
