पुणे जिल्हा प्रतिनिधी - उमेश जोशी
दि.१०/मे/२०२६ रविवार रोजी पुणे बालगंधर्व चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापर्यंत नसरापूर येथे घडलेल्या घटनेने व निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने अवघा महाराष्ट्र संतापाने पेटून उठला आहे. प्रत्येक संवेदनशील मन हादरले आहे. या नराधमाच्या विकृतीचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील नाकरिकांनी एकत्रित येऊन जनआक्रोशाचा हा शांततेत मूकमोर्चा काढण्यात आला.
प्रत्येकाच्या हातातील फलक वेगवेगळ्या पध्दतीने , डोळ्यांतील संताप आणि मनात दाटलेला सूड घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले होते. माता-भगिनी, तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. " नसरापूरला झालेल्या चिमुकलीवर अशा विकृतीच्या अन्यायला न्याय मिळालाच पाहिजे" भर चौकात नराधाला फाशी किंवा छत्रपती शासन करायलाच हवे ,छत्रपती शासन हाच आता पर्याय , अशा घोषणांनी अवघा परिसर दणाणून गेला ..
पीडीत मुलीच्या वडिलांनी म्हणजे शुभम कुलकर्णी गुरूजी यांनी प्रथम मुलीला श्रध्दांजली वाहून मनातील भावना प्रशसन न्यायव्यवस्था काय करेल कधी करेल ? माहित नाही परंतु जर या पुढे असे झाले तर पोलीस प्रशासनाला न कळवता आधी हातात सापडलेल्या नराधामाला सोडू नका , आणि असे नीच कृत्य विविध जिल्ह्यात , शहरात , नगरात , गावात , आधीपण झाले , अत्ता झाले , आता बस इथून पुढे होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन , कायदा न्याय व्यवस्था यांनी कठोर पाऊले उचलावीत अशा मनातील भावना व्यक्त केले व मागणी केली..
हा फक्त मुकमोर्चा नाही…
हा प्रत्येक समस्त पुणेकराच्या मनातला तीव्र संताप आहे. एका निरागस चिमुकलीसोबत झालेल्या अमानुष घटनेविरोधात आज संपूर्ण समाज एकत्र उभा आहे. न्यायासाठी उठलेला हा आवाज आता थांबणार नाही आणि थांबवणार पण नाही .
चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे…आणि त्या अशा विकृत नराधमांवर कठोरात कठोर अशी सर्वांसमोर शिक्षा झालीच पाहिजे की परत असे कृत्ये पुन्हा करण्याचे धाडस कोणीही करणारं नाहीत.. आज प्रश्न हा फक्त एका कुटुंबाचा नाही तर प्रश्न आता प्रत्येक मुला- मुलीच्या सुरक्षिततेचा आहे.
