मुनीर अब्बास शाह. बाजार सावंगी
खुलताबाद तु मला खुुप आवडते, मला तुझ्याशी लग्न करायचे असे म्हणून एका १९ वर्षीय मुलीची काटशिवरी फाटा येथे छेडछाड करणाऱ्या मुलाविरोधात खुलताबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील गोळेगाव येथील १९ वर्षीय मुलगी ही काटशिवरी फाटा गदाणा येथे करिअर अकॅडमीत प्रशिक्षण घेत असतांना आरोपी विनोद हरीदास गायकवाड रा. गोळेगाव हा शुक्रवार (दि. ८) रोजी करिअर अकॅडमी जवळ जावून सदर पिडित मुलीस तु मला खुप आवडते, मला तुझ्याशी लग्न करायचे असे म्हणून छेडछाड केली. दरम्यान यापुर्वी ही आरोपी विनोद गायकवाड हा सतत मुली त्रास देत असल्याने सदर पिडित मुलीने घरी आई-वडिलांना सांगितले होते. मात्र, सततच्या त्रासाला कंटाळून अखेर आरोपी विनोद गायकवाड विरोधात पीडित १९ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी (दि.९) छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार राजेंद्र मुळे करत आहेत.
