Breaking Ticker

पिकअप आणि कारचा भीषण अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही



आंबेगाव (पुणे)प्रतिनिधी :-

पिकअप आणि कारचा भीषण अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मंचर भीमाशंकर रोडवर आज झालेल्या भीषण रस्ता अपघातात पिकअप वाहन आणि कार यांची जोरदार धडक झाली. अपघात इतका गंभीर होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.


    मिळालेल्या माहितीनुसार पिकअप गाडी MH-16-CC-9431 ही गाडी मंचर कडून घोडेगाव च्या दिशेने मार्बल फरशी घेऊन जात होती. आणि भीमाशंकर कडून मंचर च्या दिशेने वॅगनार गाडी MH-16-DM-6855 ही गाडी शेतीच्या खतांची ऑर्डर घेऊन मंचर ला चालली होती. परंतु अपघाती वळणार दोन्ही गाड्यांच्या चालकांना अंदाज न आल्याने समोरा समोर धडक झाली.


अपघातानंतर काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहनांमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती मिळाली आहे.


प्राथमिक माहितीनुसार, वेग आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे हे अपघाताचे कारण असू शकते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.