Breaking Ticker

जत नगरपरिषदेच्या नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या पंप हाऊसचे थाटात उद्घाटन



सांगली: प्रतिनिधी(अरुण कोळी)

जत शहर आणि परिसरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला आता गती मिळाली आहे. या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पंप हाऊसचे भूमिपूजन व उद्घाटन जतचे उपनगराध्यक्ष माननीय विक्रम दादा ताड यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

या प्रसंगी जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत असून, यामुळे जत शहरातील पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाला सभापती गौतम भाऊ ऐवाळे, सभापती मिथुन भिसे, सभापती फिरोज भाई नदाफ, शहराध्यक्ष अण्णा भिसे यांच्यासह जत नगरपरिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून, जतच्या विकासामध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. प्रशासनाकडून या कामाला गती देण्यात आली असून लवकरच ही योजना पूर्णत्वास नेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.