संबंधितावर कठोर कारवाई करा भिम टायगर सेना आक्रमक
प्रतिनिधी ( प्रवीण बरडे )
माहूर तालुक्यातील मौजे कुपटी येथे समाजातील एका व्यक्तीने समाजाकडून लोक वर्गणी करून बौद्ध विहाराचे बांधकाम आपल्या शेतामध्ये केले. विहारामध्ये गौतम बुद्धाची मूर्ती न बसवता वित्तू बाबा ची मूर्ती बसवल्यामुळे समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन फुल सावंगी येथील ( सामाजिक कार्यकर्ते ) सिद्धार्थ रणवीर यांनी माहूर पोलिसात तक्रार करून ( भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ) दादासाहेब शेळके ,व भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, यांच्या ही बाब लक्षात आनुन दिली असता दादासाहेब शेळके, यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो भीमसैनिकांचा ताफा संबंधित ठिकाणी पोहोचून पाहणी करण्याकरिता गेले असता पोलीस प्रशासनाने विहराकडे जाण्यापासून रोखून धरल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . परंतु दादासाहेब शेळके, यांनी भीमसैनिकांना कायदा न मोडण्याचे आवाहन केले व.डी .वाय एस .पी . किरण भोंडवे साहेब, व माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे ,ए. पि.आय. शरद घोडके ,यांच्यासोबत सविस्तर चर्चे नंतर पोलीस पोलिसांनी बौद्ध विहारातील वीत्तूबाबांची मूर्ती काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे दादासाहेब शेळके यांनी सांगितले . त्यावेळी भिम टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष . प्रवीण बरडे, संपर्कप्रमुख समाधान कांबळे, मार्गदर्शक शे .रफिक गाईड ,सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तामगाडगे, सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे, धम्मानंद कावळे, सिद्धार्थ रणवीर, गजानन मोरे, व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
विहारातील वित्तूबाबाची मूर्ती काढून कारवाई न केल्यास यापुढे मोठे आंदोलन करनार असल्याचे दादासाहेब शेळके यांनी सांगितले .
