महीला पोलिस कर्मचाऱ्याची दोन महिन्यांपासून कमीशनर ऑफिसला हेलपाटे.....
मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर प्रतीनीधी.
महिला पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार दोन महिन्यांपासून प्रलंबित; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
महिलांच्या सुरक्षा आणि सन्मानाच्या गप्पा मारणाऱ्या पोलीस विभागातच एखाद्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला स्वतःला असुरक्षित वाटत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक मानली जात आहे. शहरातील जिन्सी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध महिला छळ आणि अत्याचारासंदर्भातील गंभीर तक्रार दाखल करूनही तब्बल दोन महिने उलटून गेले असताना कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने ६ एप्रिल २०२६ रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त (सामान्य प्रशासन) यांच्याकडे चार पानी सविस्तर लेखी तक्रार सादर केली होती. या तक्रारीत जिन्सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी मुरलीधर बुधवंत यांच्याविरुद्ध महिला छळ व अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पीडित महिला कर्मचाऱ्याने पोलीसशिवाजी मुरलीधर बुधवंत, जेठ पोलिस इंस्पेक्टर, पुलिस थाना जीन्सी आयुक्तांची भेट घेऊन आपली व्यथा मांडल्याचेही सांगितले जाते.
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कार्यालयाकडून "तपास सुरू आहे" असे उत्तर देण्यात आले. मात्र जवळपास दोन महिने उलटूनही या प्रकरणात कोणताही स्पष्ट निर्णय किंवा कारवाई झालेली नसल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणाची चर्चा पोलीस विभागातही सुरू असल्याचे सांगितले जाते. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाईची अपेक्षा ठेवली जाते, तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध
निष्पक्ष चौकशीची मागणी
नागरिक आणि महिला हक्क कार्यकत्यांनी या प्रकरणाची पारदर्शक, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे. तक्रारीतील आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी, तसेच आरोप असत्य ठरल्यास त्याबाबतची माहितीही स्पष्टपणे सार्वजनिक करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या संपूर्ण शहराचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवर पोलीस प्रशासन नेमका काय निर्णय घेते, याची उत्सुकता आहे. न्याय मिळण्यास होणारा विलंब हा न्याय नाकारल्यासारखा ठरू नये, अशी भावना आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
केलेल्या गंभीर तक्रारीवर इतका विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील नागरिकांमध्येही या प्रकरणाबाबत चर्चा रंगू लागली आहे. पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनाच सुरक्षित वाटत नसेल, तर सर्वसामान्य महिला, विद्यार्थिनी आणि युवतींच्या सुरक्षेबाबत कोणता संदेश जात आहे, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे.
सूत्रांचे म्हणणे आहे की, तक्रारीची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास महिला संघटना आणि सामाजिक कार्यकत्यांकडून पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला जाऊ शकतो. मात्र यासंदर्भात प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
