Breaking Ticker

40 फुट खोल विहिरीत पडलेल्या गाई ला जीवनदान



विहिरीत ४० फूट खोल पडलेल्या गायीला जीवदान गौरकक्ष धनंजय माळेकर व कृष्णा केदारे यांचे धाडसी बचावकार्य रात्रीच्या अंधारात ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या गायीचे प्राण वाचवण्यात गौरक्षक धनंजय माळेकर आणि कृष्णा केदारे यांनी धाडसी कामगिरी केली. ही घटना रात्री सुमारे ८ वाजताच्या दरम्यान घडली. रिसोड शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या मागे शेतातच एका विहिरीत गाय पडल्याची माहिती मिळताच बजरंगदल चे कार्यकर्ते व धनंजय माळेकर , कृष्णा केदारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता दोघांनी विहिरीत उतरून दोरीच्या सहाय्याने गायीला सुरक्षितपणे बाहेर काढले. जवळपास तासभर चाललेल्या या बचावकार्यात ग्रामस्थांनीही मदत केली.

या धाडसी कार्यामुळे गायीचे प्राण वाचले असून परिसरातून गोलरक्षकांच्या कामाचे कौतुक होत आहे. संकटसमयी दाखवलेल्या तत्परतेमुळे धनंजय माळेकर आणि कृष्णा केदारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.