50 वाहनावर कायदेशीर दणका तर 30 वाहने जप्त.
अंबाजोगाई प्रतिनिधी:-( विशाल जोगदंड)
अंबाजोगाई शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अंबाजोगाई पोलिसांनी विशेष मोहीम राबवत रस्त्यावर अडथळा होईल असे लावलेल्या वाहनावर सायंकाळी 6 ते 8:30 कारवाई केली.
या मोहिमे दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रस्त्यात अडथळा निर्माण होईल अशी अस्ताव्यस्त लावलेल्या 50 वाहनावर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली तर 30 वाहने जप्त करण्यात आली.
वाहतुकीला रस्ता मोकळा करणे व प्रवासी वाहतुकीला सुरळीत सुरक्षित प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश.
अंबाजोगाईत वाहने उभी करण्यासाठी पार्किंग ची सुविधा उपलब्ध नाही. शिवाजी चौकातील नगरपालिकेने 'नगरपालिका कॉम्प्लेक्स'' इमारतखाली तळमजला पार्किंग साठी लाखो रुपये खर्च करून उभारला असला तरी तो नगरपालिकेने बंद करून धूळखात पडला असून लाखो रुपये कचऱ्यात घालून राख का केली हा प्रश्न उपस्थित होत आहे.पोलिसांची कारवाई योग्य असली तरी वाहन धारांनी पार्किंग कुठं करावी हा प्रश्न निर्माण झाला
