Breaking Ticker

गणेशपूर येथे शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे कृषी तंत्रज्ञानाची माहिती..



सम्यक रविंद्र घुले, यवतमाळ

दारव्हा ता: कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत परिसरातील गणेशपुर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून डिजिटल कृषी सेवा, महाडीबीटी योजना,कृषी यंत्रसामग्रीचा वापर तसेच मोबाईलद्वारे शासकीय योजनांची माहिती कशी मिळवावी याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना स्मार्टफोनचा प्रभावी वापर करून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा करावा अर्जाची स्थिती कशी तपासावी तसेच विविध कृषी अनुदान योजनांची माहिती कशी मिळवावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.यावेळी कर्जमाफी योजनेची स्थिती मोबाईलवर कशी तपासावी ,पीक विमा, हवामान अंदाज, बाजारभाव आणि कृषी विभागाच्या विविध सेवांचा लाभ ऑनलाइन पद्धतीने कसा घ्यावा याबाबतही माहिती देण्यात आली व तसेच आधुनिक कृषी यंत्रसामग्रीची माहिती त्यांचे फायदे वापरण्याची योग्य पद्धत आणि यंत्रसामग्रीची व्हिडिओद्वारे माहिती मोबाईलवर कशी पाहावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे शेतीतील मजुरी खर्च कमी होऊन उत्पादन वाढीस मदत होते असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या उपक्रमात कृषि विद्यार्थ्यांनी *खुशबू साखरकर , कल्याणी सवाईशाम , साक्षी शेंदुरकर, श्रेया ताजणे ,धनश्री विधाते आणि प्रेरणा वाढवे* यांनी शेतकऱ्यांच्या शंका दूर करून त्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित केले. कार्यक्रमाला गावातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज. ए. खाडे, विषय विशेषज्ञ प्रा.अघम तसेच कार्यक्रम प्रभारी प्रा.देशमुख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.