Breaking Ticker

शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या लॉन्ड्री व्यावसायिकाला परीट समाजाची मदतीची साथ



सांगली प्रतिनिधी(अरुण कोळी): 

जत येथील साई प्रकाश मंगल कार्यालयाशेजारी असलेले परीट समाज बांधव श्री विजय साळुंखे यांचे लॉन्ड्रीचे दुकान शॉर्टसर्किटमुळे जळून मोठे नुकसान झाले. या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी समाज बांधवांकडून आवाहन करण्यात आले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत सांगली जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे रोख ६,००० रुपये तसेच एक इलेक्ट्रिक इस्त्री देऊन मदतीचा हात पुढे केला. ही मदत श्री विजय साळुंखे यांच्या पत्नींकडे सुपूर्द करण्यात आली.

या उपक्रमासाठी श्री दिगंबर साळुंखे व श्री जयसिंग परीट यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी समाजबांधव श्री महेश परीट, श्री राजू कोरे, श्री अविनाश कोरे व श्री संजय साळुंखे उपस्थित होते.समाजातील अडचणीत सापडलेल्या बांधवाला दिलेल्या या मदतीमुळे परीट समाजातील एकोपा व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.