Breaking Ticker

मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील वादळी वाऱ्याने सोलर पंपाची मोठे नुकसान



प्रतिनिधी राजाराम लिपणे

मौजे सिद्धनाथ बोरगाव (ता . सेलू )येथील शेतकरी जगन्नाथ दादाराव लिपणे यांच्या गट क्र .113 मधील शेतात सोलार पॅनलचे मोठे नुकसान झाले आहे तालुक्यात रविवार सोमवार जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला .या वादळी वाऱ्यामुळे जगन्नाथ दादाराव लिपणे यांच्या विहिरीवरील सोलर पॅनल उडून गेले .पॅनलचे स्टॅन्ड वाकले असून काही पॅनेल फुटल्याने सिंचन व्यवस्था ठप्प झाली .

त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले असून शेतकऱ्यांपुढे संकट उभे टाकले आहे .शासनाच्या योजनेतून बसविण्यात आलेल्या हे सोलार पंप शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरत असतानाच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडे भरपाईची मागणी केली असून अद्यापही कोणतेही मदत मिळाली नाही त्यामुळे प्रशासनाने व संबंधित यंत्रांनी होत आहे पंचनामा करून शेतकऱ्यांनी मदत द्यावी अशी मागणी करण्यात  मागणी होत आहे .



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.