बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार....
मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर प्रतीनीधी.
ऐकावे ते नवलच सर्वसामान्यांवर आली आहे. विज्ञानाची ऐसी की तैसी गरोदरची पुर्ण प्रक्रिया राबवूनही प्रसुती वेळा तपासणी नंतर सदर महिला गरोदर नसल्याचे समोर आले. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. परिणामी सावंगी आरोग्य केंद्रात एकच राडा झाला असून हा विषय चर्चेचा ठरत आहे.
अधिक माहिती अशी की,बाजार सावंगी गावातीलच नवविवाहितेला दिवस गेले म्हणून आरोग्य केंद्रा अंतर्गत सात-आठ महीने गरोदर आरोग्य प्रक्रिया राबविण्यात आली. ८ जून रोजी त्रास होत असल्याने त्यांना बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्रसुती प्रथमच असल्याने केंद्रातून घाटीसाठी 'रेफर' करण्यात आले. परंतु घाटीत नेल्यानंतर नवविवाहिताला दोन तीन दिवस प्रसुतीसाठीच्या कळा निघत नाही, प्रसुतीचे कुठलेच लक्षण दिसून येत नसल्याने घाटी रुग्णालय प्रशासन विभागाने
