पोलिसांनी लाथा मारल्याने हृदयविकाराचा झटका येऊन शिक्षक बोरसे यांचा मृत्यू : खैरे पोलिसांनी आरोपींवर खुनाचे कलम का लावले नाही? वेरूळ येथील शिक्षक मृत्यूप्रकरण
मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर प्रतीणधी
खुलताबाद/वेरूळ
पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली शिक्षक सुरेश बोरसे यांच्या छातीवर लाथा मारल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींवर खुनाचे ३०२ कलम का लावले नाही? याची मी वरिष्ठ पातळीवर चौकशी करणार आहे. तसेच आरोपींना तात्काळ जामीन मिळण्यामागे मोठी लिंक असून, राजकीय दबावाची चौकशी करण्यास भाग पाडू, असे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. 'मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडासारखी परिस्थिती झाल्याचे पदेशमुख नमूद केले. न्याय न मिळाल्यास आरोपींना त्यांच्या गावातून पिटाळून लावू,' असा थेट इशारा त्यांनी एएसपी अपराजिता अग्निहोत्री यांना दिला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रविवारी बोरसे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच कायदेशीर लब्धात सोबत राहण्याचे आश्वासन दिले. या घटनेनंतर हळूहळू दोर्षीवर कारवाईसाठी दबाव वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनेतील दोषी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे गुन्ह्यात नोंदवावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्याकांडासारखी परिस्थिती घटनेचे चित्रीकरण असणारे दोन मोबाइल फॉरेन्सिकने केले जप्त माजी खासदार खैरे यांनी बोरसे कुटुंबाची भेट घेऊन संवाद साधला
खुनाचा गुन्हा दाखल व्हावा : शिक्षक संघटना
दोर्षीवर ३०२ गुन्हा दाखल होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षक बोरसे हे धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तिमत्त्व होते. महाविकास आघाडी गृहविभागाला धारेवर धरण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री अतुल सावे व आमदार प्रशांत बंब हे देखील आज वेरूळला बोरसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
पीएसआय नागरगोजें सह इतरांची चौकशी सुरू
प्रकरणातील व्हीडीओत आरोपी दिसत असले तरी, घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजताच तक्रार नोंदवली आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार सुरुवातीला अनोळखी व्यक्ती असा उल्लेख करावा लागला. तपासादरम्यान जे संशयित निष्पन्न झाले आहेत, त्यांची नावे गुन्ह्यात समाविष्ट केली आहे. उपनिरीक्षक नागरगोजे व इतर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झाल्यास किंवा ते दोषी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. - प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक, ग्रामीण माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बोरसे कुटुंबीयांची भेट घेतली.
कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा करा: मृताची आई
माजी खासदार खौरे यांनी बोरसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा मृत शिक्षक बोरसे यांच्या आई मालतीबाई बोरसे यांनी टाहो फोडला. 'माझ्यासाठी माझा डोंगर गेला... कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्यांना कडक शिक्षा होऊन न्याय मिळावा,' अशी विनंती त्यांनी केली. यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.
दोषींवर कठोर कारवाई करावी: आमदार काळे
शिक्षक बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार विक्रम काळे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सर्व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.
इनसाइड पोलिसाची मंत्र्यांशी
जवळीक, कारवाई संय या घटनेचा व्हिडिओ ज्यावरून काढला आणि व्हायरल झाला असे दोन मोबाइल फॉरेन्सिक पथकाने जप्त केले. त्यात बोरसे कुटुंबातील एक आणि वेरूळ गावातील अन्य एकाच्या मोबाइलचा समावेश आहे. या प्रकरणात नाव आलेल्या वैजापूरच्या पोलिसाची एका मंत्र्यांसोबत जवळीक असल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वेरूळला फॉरेन्सिक टीमने बोरसे कुटुंबीयांकडून पुरावे घेतले.
व्हिडिओ फुटेजआधारे तपास : अग्निहोत्री गेल्या चार दिवसांपासून फॉरेन्सिक टीम, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि मोबाईल व्हिडिओ फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, पुरावे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. आरोपींना सूट न देता तात्काळ न्यायालयात चार्जशीट दाखल केली जाईल, असे एएसपी अपराजिता अग्निहोत्री यांनी सांगितले.
