आरोग्य विभागाची जागा द्यावी शाळा व्यवस्थापन समितीची मागणी
संपूर्ण राज्यात आदर्श शाळा म्हणून गौरवण्यात आलेल्या जत येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक या शाळेत ८३७ एवढ्या विक्रमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे शाळा खोल्यांची टंचाई निर्माण झाली आहे. शेजारीच असलेली आरोग्य विभागाची जागा या शाळेला देण्यात यावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देवकर, सभापती इम्रान गवंडी, युवा नेते प्रकाश मोटे यांनी केली आहे.
संतोष देवकर म्हणाले की, शाळा नंबर एकला डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य आदर्श शाळा, आयएसओ मानांकन 2015, .2021 मॉडेल स्कूल 2024, तंबाखू मुक्त शाळा अशा विविध पारितोषिके मिळाली आहेत. अवघा 73 पट व तीन शिक्षक असणाऱ्या या शाळेमध्ये आज या शाळेमध्ये राज्यांमध्ये सर्वात जास्त पटसंख्या असणारी शाळा असा नावलौकिक कमावलेला आहे. या शाळेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सन 2026. 27 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता पहिलीसाठी 153 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे अजूनही 30 विद्यार्थी वेटिंग आहेत याव्यतिरिक्त याच वर्षांमध्ये खाजगी शाळा माध्यमिक शाळा व इंग्रजीच्या माध्यमाच्या शाळेतून 222 विद्यार्थ्यांनी ही या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे गेल्या वर्षी या शाळेचा पट 595 होता परंतु या वर्षी या शाळेचा पट 837 असा झालेला आहे.
मोठ्या संख्येने विद्यार्थी दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे खोल्यांची शाळेला टंचाई निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना वर्गात बसवणे अवघड आहे अशा परिस्थितीत शेजारीच आरोग्य विभागाचा जुना दवाखाना आहे या ठिकाणी असलेले तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित झाले त्यामुळे इमारत सध्या पडून आहे. ही इमारत एक नंबर शाळेसाठी जिल्हा परिषद घ्यावी अशी मागणी देवकर गवंडी व मोटे यांनी केली.
देवकर म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीने पट वाढीसाठी राबविलेल्या विविध उपक्रम व शाळेची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य आणि पालकांचा असणारा सर्वात मोठा विश्वास याशिवाय या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी शिक्षिका प्रत्येक मूल आपला आहे समजून प्रत्येक मुलांच्या असणाऱ्या अडचणी त्या समजावून घेऊन त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत असतात येणाऱ्या प्रत्येक मुलाला वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते इतर शाळेतून जर कच्ची मुले आले त्या मुलाच्या मनामध्ये असणारा भिती कमी करून ते विद्यार्थी शाळेतील इतर विद्यार्थ्यांबरोबर कसे राहतील यासाठीची कार्यशाळा पालकाच्या सोबत चर्चा करून शिक्षक एक टारगेट ठरवतात व हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ठराविक वेळ घेऊन सर्व विद्यार्थी गुणवत्तेत कसे तयार होतील यासाठी ही शाळा प्रयत्न करत असते या शाळेने आतापर्यंत अनेक बक्षिसे मिळवलेले आहेत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये सदर शाळेने सन 2022-23 मध्ये तालुकास्तर प्रथम क्रमांक मिळवून तीन लाख रुपये जिंकलेले आहेत 24 25 ला या शाळेने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून पाच लाखाचे बक्षीस जिंकलेला आहे आणि 2025.2026मध्ये या शाळेने विभाग स्तरावरती सहभाग घेऊन 15 लाख रुपये जिंकलेले आहेत ही शाळा प्रत्येक वर्षी शालेय सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून या शाळेने जिल्हास्तरावरती एक वेगळा ठसा उमटवलेला आहे या शाळेने लोक नृत्य स्पर्धेमध्ये सलग तीन वर्षे आपल्या धबधबा कायम ठेवलेला असून प्रथम द्वितीय या क्रमांकावर ही शाळा नेहमी असते याव्यतिरिक्त इंग्रजी कॉन्व्हर्सेशन वर राइम्स या स्पर्धेमध्ये देखील शाळेचा त जिल्ह्यामध्ये दबदबा आहे याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचे म्हणजे अबॅकस या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घ्यायला लावून राष्ट्रीय स्तरावरती हे विद्यार्थी चमकलेले आहेत याचबरोबर डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती मध्ये इयत्ता दुसरी ते पाचवी पर्यंतच्या शाळांमध्ये एकूण 35 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चालू वर्षे आलेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे या स्पर्धा परीक्षेमध्ये पास होण्याचे सरासरी प्रमाणे 75 टक्के पेक्षा जास्त आहेइयत्ता पहिलीपासूनच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत असल्यामुळे पालकांचा एक खूप मोठा ओढा या जिल्हा परिषद शाळेकडे आहे विविध स्पर्धेम्ळे त् लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी या ठिकाणी होत असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी पालक ही खूप सहकार्याच्या भूमिकेतून या शाळेला सहकार्य करत असतात ही शाळा दर महिन्याला पालक सभेचे आयोजन करते पालक सभेच्या उपस्थिती ही जवळ जवळ 90% च्या आसपास असते प्रत्येक पालकाला आपली बाजू मांडण्याचा व आपल्या पालकाची होणारे प्रगती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाते. पालक शिक्षक व शाळा या सर्वांमध्ये एक अतिशय गाढा विश्वास निर्माण झालेला आहे याचबरोबर ही शाळा विद्यार्थ्यांना स्केटिंग च्या माध्यमातून उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये विविध सहशाले उपक्रमाचे आयोजन शाळा करत असल्यामुळे आणि गुढीपाडव्याला ऍडमिशन झाल्यानंतर पुढचे दोन महिने पुढच्या वर्षीचा वर्ग सलग चालवला जातो त्यामुळे पहिली मध्ये दाखल होण्यापूर्वीच या विद्यार्थ्यांची चांगली तयारी ही दोन महिन्यांमध्ये ही शाळा करून घेते याव्यतिरिक्त संगणक शिक्षण खूप छान पद्धतीने या शाळेमध्ये दिले जाते या शाळेची ओळख म्हणजे या शाळेचे असणारी शिक्षक बँक या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ साठी किंवा इतर कामासाठी पालकांनी दिलेले पैसे आहेत ते पैसे विद्यार्थी शाळेचे बँकेमध्ये आणून जमा करतात बँकेतील व्यवहार कसे चालतात तसेच सर्व बाबींची या ठिकाणी शाळेने तयार केले आहे विद्यार्थ्यांसाठी चलन पासबुक पैसे जमा खाते पैसे काढणे या सर्व बाबी विद्यार्थी स्वतः शाळेमध्ये करीत असतात त्यामुळे एक बचतीची सवय लावण्याचे काम या शाळेने लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी केलेला आहे सगळ्यात महत्त्वाची या शाळेची सकाळी होणारी व प्रार्थना संगीतमय प्रार्थना ही शाळा दररोज घेत असते एकाच वेळी सर्व विद्यार्थी एका तालासुरामध्ये एक आनंदी वातावरण शाळेच्या सुरुवातीलाच या शाळेमध्ये निर्माण होत असल्यामुळे अतिशय शांतपणे ही मुलं सकाळच्या प्रार्थनेमध्ये सहभागी होतात दररोज एका वर्गाला परिपाठाचे सादरीकरणाचे संधी दिली जाते संपूर्ण मुलांच्या कडून जनरल नॉलेजचे प्रश्न हे परिपाठ असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकाळी बोर्ड वरती लिहिलेले असतात इतर सर्व विद्यार्थी ते लिहून घेतात त्यामुळे जनरल नॉलेजचे जवळ वर्षभरामध्ये हजार ते 2000 प्रश्नांच्या एक संच विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये तो तयार होतो त्याचा वापर ही विद्यार्थ्या आपल्या जीवनामध्ये करत असतात शाळा व्यवस्थापन समितीने या शाळेसाठी साडेआठ हजार ग्रंथालयाच्या पुस्तके ग्रंथालयाला उपलब्ध करून दिले आहेत शाळेमध्ये मुलांचे वाढदिवस साजरी केले जातात वाढदिवसाच्या होणारा सगळा खर्च हा पालक या शाळेसाठी लागणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या गरजेच्या वस्तू ह्या शाळेला घरी वाढदिवस साजरा न करता शाळेमध्ये साजरा करून तो निधी शाळेच्या विविध कामासाठी पालक या ठिकाणी देत असतात त्यामुळे अल्पावधीतच या शाळेने चांगली कामगिरी केलेले आहे परंतु सध्या या शाळेचा पट वाढत असल्यामुळे भौतिक सुविधा अत्यंत कमी आहेत त्यामुळे या शाळेसाठी जागेची नितांत गरज आहे त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने एक प्रस्ताव तयार करून सध्या जिल्हा परिषद सादर केलेला आहे जर त्यांना मान्यता मिळाली तर भरपूर विद्यार्थी या शाळेमध्ये अजून येतील हे गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल यासाठी ही शाळा व्यवस्थापन समिती कटिबद्ध आहे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेब जिल्हा परिषद अध्यक्षा पाटील मॅडम उपाध्यक्ष लाड शाहेब कृषी सभापती पाटील मॅडम आदरणीय तालुक्याच्या सभापती अर्चना पाटील मॅडम उपसभा पती बगली साहेब गट विकास अधिकारी साहेब गटशिक्षण अधिकारी राम फरकांडे साहेब सर्व पंचायत समिती सदस्य सर्व जिल्हा परिषदेचे आदरणीय सदस्य या विस्तार अधिकारी शेख सो गवारी सो सर्वांचे खूप मोठे सहकार्य या सर्व बाबीसाठी नेहमीच असतं नगरपालिका ही आमच्या उपक्रमामधे मध्ये सहभागी असते नगरपालिकेचे शिक्षण सभापती इमरान गवंडी नगराध्यक्ष आदरणीय आरळी साहेब समाज कल्याण सभापती आदरणीय ऐवळे साहेब या सर्वांचाही यामध्ये अतिशय मोलाचा वाटा या ठिकाणी आम्हाला असतो सर्व नगराध्यक्ष हे नेहमीच या शाळेसाठी हिरेरणी भाग घेऊन शाळेसाठी लागणाऱ्या सर्व गरजांची 100% पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामध्ये सर्व नगर सेवकांचा वाटाही खूप मोलाचा आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देवकर उपाध्यक्ष रोहिणी जाधव सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य या सर्वांच्या सहकार्यातून ही एक शाळा नवा रुपाला आणण्यासाठी या सर्व जत वाशियांचा खूप मोठा पुढाकार आहे
