सोनपेठ प्रतिनिधी( शिवशंकर तुपकर ) :-
जागतिक एकल महिला दिनानिमित्त सोनपेठ तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी एकल महिलांना कृषी समृध्दी सहकारी संस्थेच्या वतीने पेरणीसाठी सोयाबीन व कापसाचे बियाणे देण्यात आले.
सोनपेठ तालुक्यात झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त एकल शेतकरी महिलांना कृषी समृध्दी सहकारी संस्था सोनपेठ यांच्या वतीने सोयाबीन व कापसाचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक एकल महिला दिनाच्या निमित्ताने हे बियाणे एकल महिलांना त्यांच्या घरी जाऊन देण्यात आले. वाणी संगम येथील आत्महत्याग्रस्त एकल शेतकरी महिला प्रियंका विलास काळे यांना
सोनपेठ तहसीलदार सुनील कावरखे, पंचायत समितीचे उपसभापती पद्मसिंह देशमुख भारत राष्ट्र किसान समितीचे सुधीर बिंदू यांच्या उपस्थितीत बियाणे देण्यात आले. तर उक्कडगाव येथील भाग्यश्री महेश चांदवडे यांना
विठ्ठल कृषी सेवा केंद्राचे आशिष विठ्ठल पुरबुज, कैलास कृषी केंद्राचे प्रणव प्रशांत पापंटवार यांच्या हस्ते बियाणे देण्यात आले यावेळी कृषी समृध्दी सहकारी संस्थेचे सचिव सोमनाथ नागुरे, कृषी सहायक ज्ञानेश्वर लव्हाळे, महेश घेवारे , तलाठी शाहुराव दिक्षीत ,वाणी संगमचे पोलीस पाटील शेषेराव चव्हाण, प्रताप भंडारे , रामेश्वर चांदवडे, भगवान चांदवडे, रवीराज चांदवडे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.
सोनपेठ तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त एकल महिलांच्या पाल्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेणार :- सुधीर बिंदू सोनपेठ तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त एकल शेतकरी महिलांच्या शिक्षण घेणाऱ्या पाल्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी संस्थेच्या वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधीर बिंदू यांनी दिली . या साठी कृषी समृध्दी सहकारी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
