Breaking Ticker

रात्री गौण खनिजाची वाहतूक धडाकेबाज.... गौण खनिज माफियांना आले अच्छे दिन.....



 मुनीर  अब्बास शाह  छ.संभाजीनगर प्रतीणीधी....

खुलताबाद तालुक्यातील गौण खनिज माफिया 

महसूल पथकाला न जुमानता अवैध उत्खनन व वाहतूक जोरदार सुरुच असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. सुलतानपूर महसूल मंडळामध्ये कावळे यांच्या पथकाने गिरीजा मध्यम प्रकल्पाचे मागील परिसरात अवैध वाळू साठा करून ठेवल्याने त्यावर कारवाई करण्यात आली. वाळु साठा साठी कुणी समोर न आल्याने अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. सदरील वाळू साठा तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त करण्यात आला. ही कारवाई होताच अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले. परंतु, दोन दिवस जात नाही तोच ते सक्रिय झाले आहेत. तालुक्यातील सुलतानपूर, महसूल व बाजार सावंगी महसुल मंडळात अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून त्याची रात्रीच्यावेळी बिनधास्तपणे वाहतुक सुरू आहे. तहसील प्रशासनाने यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.