Breaking Ticker

विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने गायीला लागला करंट,नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली...



 सम्यक घुले प्रतिनिधी-यवतमाळ 

अकोला बाजार येथील वार्ड क्र. 2 आठवडी बाजार येथील संतोष खंडारे यांच्या घराजवळ असलेल्या विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने एका गायीला करंट लागल्याची घटना घडली.घटना घडताच परिसरातील नागरिकांनी संबंधित लाईनमनला फोन करून माहिती दिली. त्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली.

शुक्रवारी अकोला बाजार येथे आठवडी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. अशा परिस्थितीत विद्युत खांबातून करंट प्रवाहित होत असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.परिसरातील धोकादायक विद्युत खांब तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे...



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.